file photo 
नागपूर

टाकळीकरांनी हातळल्या फाईल्स?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना एसीबीने अटक केली. जामीन मिळताच विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात मर्जीतील कर्मचाऱ्यांशी भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत काही फाईल्स पोहोचत्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. 
कामाचे बिल काढण्यासाठी एक कंत्राटदारला टाकळीकर यांनी सहा लाखांची मागणी केली. दोन लाखांचा पहिला हप्ता देण्याचे निश्‍चित झाले. संबंधित कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचत त्यांना अटक केली. संबंधित कंत्राटदारला काम मिळवून देण्यासाठी टाकळीकर यांनी मदत केल्याचे सांगण्यात येते.टाकळीकर यांनाही संबंधित कंत्राटदारावर भरोसा नसल्याचे अनेकाकडे बोलून दाखविल्याचे सांगण्यात येते.

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटदार भारी!

टाकळीकर यांना गुरुवारला अटक करण्यात आली. सोमवारला त्यांना जामीन मिळाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारला ते विभागीय आयुक्त परिसरात आले. पाणी पुरवठा कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. हे सर्व कर्मचारी टाकळीकर यांच्या मर्जीतील असून त्यांच्याकडे काही फाईल्स असल्याचे सांगण्यात आले. जुन्या तारखेत यावर स्वाक्षरी करण्यात आल्याचीही जोरदार चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाकळीकर अनेकदा फाईल्स घरी घेवून जात असत. अनेक फाईल्स त्यांच्याकडे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सीईओ योगेश कुंभेजकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. 


सीसीटीव्ही तपासल्यास सत्य येणार समोर 
जिल्हा परिषदेत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यास कोणते कर्मचारी फाईल्स घेवून बाहेर गेले, हे समोर येईल, असा दावा काहींकडून करण्यात आला. 

काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही
नानक कंस्ट्रक्‍शनबाबत असलेल्या तक्रारी लक्षात घेता कोणतेही काम न देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. फारच कमी दरात घेतलेल कामही थांबविण्याचे सांगण्यात आले. काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुद्धा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले. 
रश्‍मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT