file 
नागपूर

शेवटी ५० हजार रुपये दिल्यानंतरच रुग्णालयाकडून मिळाला कोरोना रुग्णाचा मृतदेह

सतिश घारड

टेकाडी (जि.नागपूर) : पारशिवनी तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. परवा तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील बिल २लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके निघाले. मृत्यूपश्चात उरलेल्या १लाख२४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह अंतीम संस्कारासाठी रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला. सोमवारी ९१ बाधित रुग्णांसह एक बाधित मृताची भर पडल्याने तालुक्यात आता समूहसंसर्ग झाला की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शेवटी या प्रकारामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पारशिवनी तालुक्यात एका दिवसांत ९१ बाधित
पारशिवनी स्थित सुर्यंअंबा कंपनी सोबत कन्हान शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या साथीची तीव्रता वाढल्यानंतर आज उच्चांकी म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा बाधित रुग्णांचा आकडा ९१ इतका आला आहे. ग्रामपंचायत टेकाडी अंतर्गत ६५ वर्षीय व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी दगावली. २९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये तो बाधित आला होता. तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. गेल्या काही दिवसात सहावे शतक पूर्ण करून ६४५ रुग्णांची भर पडली आहे. तपासण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी रुग्णांच्या संख्येत होणारी त्यातही कुटुंबातच होणारी लागण हा काळजीचा विषय ठरत आहे. कांद्री कोविड केंद्रात सोमवारी केलेल्या ६८ चाचण्यांमध्ये २२ बाधित रुग्ण तर पारशिवनी येथे ६८ रुग्ण तर एक आर्टिपीसीआरमध्ये शनिवारला बाधित आले होते. एकूण तालुका ६४५, तर १३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचाः फटाक्यांच्या आतषबाजीत ‘साहेबां’चा वाढदिवस आणि आला चर्चेला भयंकर उधाण...

खासगी रुग्णालयात कुटुबीयांना सोसावा लागतो त्रास
प्रशासनाच्या वतीने कमी लक्षणे असलेल्या व नसलेल्यांसाठी घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत असले तरी चिंताजनक रुग्णांना व्हेंटीलेटरसाठी मात्र अजूनही पळापळ करावी लागत आहे. विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या बाबींमुळे पटकन लोकांना संसर्ग होतो आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील बिलाचा भार आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय यात कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत अनेक पिडीत कुटुबीयांनी व्यक्त केले. टेकाडी येथील मृत व्यक्तीचे कामठी खासगी रुग्णालयातील बिल २लाख ८९ हजार ६२८ रुपये इतके झाले होते. मृत्यूपश्चात उरलेल्या १लाख२४ हजार ६२८ रुपयांसाठी रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. शेवटी अति प्रयत्नांनंतर ५० हजार रुपये घेऊन मृतदेह रुग्णालयातून प्रशासनाच्या हाती देण्यात आला.

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

ZP Election Mangalwedha : नगरपालिका पराभवानंतर भाजपची सावध खेळी; जिल्हा परिषदेसाठी आवताडे–परिचारक गटात समझोता?

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

SCROLL FOR NEXT