Find out for which post you are in Nagpur University 
नागपूर

कोणत्या पदासाठी होतेय नागपूर विद्यापीठात रस्सीखेच... जाणून घ्या

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू पदासाठी अंतिम पाच उमदेवारांच्या शुक्रवारी (ता.७) ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्यात. मुलाखती झाल्यावर याच दिवशी नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीचा आदेश जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, मुलाखतीनंतर दिवसभर विविध नावांची चर्चाच विद्यापीठात रंगली होती. कुलगुरू पदासाठी मोठ्या प्रमाणात रस्‍सीखेच सुरू झाल्याने शुक्रवारी राज्यपालाकडून नव्या कुलगुरूचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे उद्याच विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


निवड करण्यात आलेल्या ३० उमेदवारांपैकी कुलगुरू शोध समितीने अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली आहे. यानंतर ही नावे राज्यपालाकडे पाठविण्यात आलीत. यात नागपूर विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व माजी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे शर्यतीत तर नांदेड येथील डॉ. गणेशचंद्र शिंदे, नागपूर जिल्ह्यातील पण सध्या नॉर्वे येथे वास्तव्यास असलेले डॉ. मोहनलाल कोल्हे आणि मुंबई येथील डॉ. सुनील भागवत या उमेदवारांची निवड झाली आहे.

शुक्रवारी या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन पद्धतीने मुलाखती राज्यपालांनी घेतल्या. मुलाखती झाल्यावर नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीचा आदेश जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, कालपासून तर आज सायंकाळपर्यंत राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आपापल्या उमेदवारांच्या निवडीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने, आज राज्यपाल कार्यालयाने कुठल्याही नावाची घोषणा करण्याचे टाळल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्याकाही वर्षात कुलगुरू निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने नागपूर विद्यापीठाच्या मुलाखतीलाही तसा संदर्भ दिला जात आहे.

राज्यपालांना असलेली भाजपची पार्श्र्वभूमी आणि राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार यामध्ये कुणाचा पारा जड ठरेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अंतिम पाच उमेदवारांच्या राजकीय आणि सामाजिक व संघटनात्मक पार्श्वभूमिवर सध्या चर्चा सुरू होती.

आज घोषणेची शक्यता
कुलगुरूंच्या मुलाखतीनंतर आता राजकारणाला वेग आला आहे. राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आपापल्या उमेदवारांसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने, आज राज्यपाल कार्यालयाने कुठल्याही नावाची घोषणा करण्याचे टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्याच विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT