Crime News esakal
नागपूर

महिला जवानाशी पर्यवेक्षकाचे अश्लील चाळे, शरीर सुखाची केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) (IGGMC) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला जवानाशी एका पर्यवेक्षकाने अश्‍लील चाळे करीत शारीरिक सुखाची मागणी (nagpur crime) केली. या प्रकरणी तक्रारीवरून पर्यवेक्षकाविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. राजू विठ्ठल पाटील (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय महिला महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात कार्यरत आहे. ती मेयो रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात आहे. राजू हा तिचा सिनिअर असून तिला नेहमी त्रास द्यायचा. तिची छेडखानी करून काढून शरीर सुखाची मागणी करायचा. गेल्या काही दिवसांपासून ड्युटीवर आल्यानंतर तिच्याशी अश्‍लील चाळे करीत होता. त्यामुळे ती जवान त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजू याला अटक केली. हे प्रकरण दडपण्यासाठी मेयोतील एका डॉक्टरने पोलिसांवर दबाव आणला होता, असेही कळते. सहा महिन्यांपूर्वीही राजूविरुद्ध पीडित महिलेने तक्रार केली होती. यावेळी त्याची बदली करण्यात आली. मात्र, त्याला नागपुरातून सोडण्यात आले नाही, अशीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

प्रभासला नेमकं झालंय तरी काय? ऑर्थोपेडिक सर्जनच्या पोस्टने वेधलं फॅन्सचं लक्ष, फॅन्स म्हणाले- ‘अन्ना, तुम्ही ठीक आहात ना?’ POST VIRAL

Lanja Flyover Traffic Update : गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा! लांजा उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू; पाहा पूर्ण पूल कधी होणार खुला?

Marathi News Live Updates : पॅलेट गन प्रकरणावरून राहुल गांधी पोहोचले पोलीस ठाण्यात; FIR नोंदवण्याच्या मागणीसाठी ठिय्या

Rahul Gandhi : राहुल गांधी 'पॅलेट गन' पीडित साहिलला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले; एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT