Nagpur Lakadganj Fire e sakal
नागपूर

नागपूर : लकडगंज परिसरात भीषण आग, फर्निचरचे पाच दुकानं जळून खाक

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील लकडगंज परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला (Nagpur Lakadgan Fire) भीषण आग लागली आहे. यामध्ये सहा आरामशिन जळून खाक झाल्या आहेत. सध्या ९ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लकडगंज (Lakadganj Nagpur) परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलाला फोन करून माहिती दिली. पण तोपर्यंत आगीने अधिक रौद्र रुप धारण केलं होतं. या परिसरातील पाच सहा फर्निचरचे दुकान देखील जळून खाक झाले आहेत. तसेच सहा आरामशिन आगीत जळाल्या आहेत. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण, ट्रान्सफॉर्मरमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT