नागपूर

...अन् पाहता पाहता सोने, चांदीचे दागिनेही लागले वितळायला

राजेश प्रायकर

नागपूर : शहराच्या पॉश धंतोली भागातील बहुमजली इमारतीतील फ्लॅटला लागलेल्या आगीत ५० लाखांचे साहित्य जळून राख झाले. एकाच मालकाचे दोन फ्लॅटमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदी सर्वच आगीत जळाले. अग्निशमन विभागाने तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

धंतोली उद्यानाच्या बाजूला विघ्नहर्ता अपार्टमेंट ही बहुमजली इमारत आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक २०१ व २०२ मध्ये आग लागली. सूरज प्रकाश नाझिया यांच्या मालकीचे दोन्ही फ्लॅट आहेत. संयुक्त कुटुंब असल्याने घरात सात ते आठ नागरिक होते. सकाळी घरातील महिला सदस्य हॉलमध्ये योगा करीत होते. त्यांना बेडरूमधून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घरातील इतर सदस्यांना सावध करीत बाहेर काढले. त्याही बाहेर आल्या. त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली.

अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. परंतु, आगीवर पाण्याचा मारा करीत असताना आगीने घरातील सर्वच साहित्य कवेत घेतले. तीन तास आगीवर पाण्याचा मारा करीत अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले. परंतु, फ्लॅटमधील कुठलेही साहित्य वाचले नाही. फ्लॅटमधील टीव्ही, तीन एसी, कपड्यांच्या आलमारी, फर्निचर, गिझर, वाशिंग मशीन सर्वच साहित्य जळाले. त्यामुळे घरात केवळ राखच दिसून आली. त्यामुळे नाझिया कुटुंब चांगलेच हादरले. घरातील सर्व कपडेही जळाल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला.

दागिणेही जळाले

या आगीत घरातील साहित्यांसोबतच सोने, चांदीचे दागिनेही जळाले. ही इमारत जुनी असून इलेक्ट्रिक वायरिंगही तेवढीच जुनी आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दागिण्यांसह एकूण ५० लाखांचे साहित्य जळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivam Associates Scam : 'शिवम'मध्ये महाराष्ट्रातील 10 हजार लोकांचे पैसे बुडाले? 'सीआयडी'च्या रडारवर सनी लिओनी, 2400 कोटींचा घोटाळा नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई

T20 Mumbai League: सूर्यकुमार यादवचे अम्पायरसोबत भांडण; वानखेडे स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा, संघ हरला अन्...

व्याख्या, विख्खी, वुख्खू! 'धूमधडाका'मधील धनाजीराव वाकडेंचं घरं कुठेय माहितेय का? मुंबई-पुणे नाहीतर या ठिकाणी झालेलं शुटिंग

SCROLL FOR NEXT