Firecrackers made the air in Nagpur bad
Firecrackers made the air in Nagpur bad 
नागपूर

नागपूरची हवा झाली खराब; वायू प्रदूषणाने शंभर मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटरची सीमारेषा केली पार

मंगेश गोमासे

नागपूर : दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे यंदाही नागपूरच्या हवेतील प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याच्या निष्कर्ष विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने काढला आहे. शहरातील वायू प्रदूषणाने शंभर मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटरची सीमारेषा पार केली आहे. विशेष म्हणजे वाढलेले प्रदूषण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे आहे.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेला केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रदूषणाच्या मोजमापाची जबाबदारी देण्यात आली होती. यानुसार संस्थेद्वारे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत हवेचे प्रदूषण मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यात प्रामुख्याने हवेतील सल्फरडाय ऑक्साईड (एसओ२), नायट्रोजन ऑक्साईड (एनओ२)आणि पीएम१० यांच्या समावेश किती? याची माहिती घेण्यात आली.

त्यात सिव्हिल लाइन्स येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १२७ मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर इतकी होती. याशिवाय उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स परिसरात १२३, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात १२४, एमआयडीसी हिंगणा परिसरात १०२ प्रति क्यूबिक मीटर इतके वायू प्रदूषण असल्याचे आढळून आले. उल्लेखनीय बाब असे की, हे सर्व प्रदूषण जवळपास दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे आहे. वायू प्रदूषणाची पातळी शंभर प्रति क्यूबिक मीटरपेक्षा वर असल्यास ती धोकादायक ठरते, हे विशेष.

टाळेबंदीत घटले प्रदूषण

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) नागरी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. यशवंत कटपाटल व त्यांच्या चमूने ‘नासा’च्या डेटाचा वापर करून हे संशोधन केले आहे. सध्याच्या टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. परंतु, जगातील वाढत्या प्रदूषणाला टाळेबंदी हे वरदान ठरले होते. वातावरणात असलेल्या धूळ, कार्बन, धुके यामुळे तयार झालेल्या प्रदूषणाच्या ढगांना एरोसोल म्हणतात. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते.

नासाचे तीन उपग्रह या एरोसोलच्या प्रमाणाचे सतत निरीक्षण करीत असतात. ‘नासा’कडून मिळवलेल्या तीन उपग्रहांच्या या डेटाचा वापर करून आणि भारतातील एरोसोल प्रमाणाचा अभ्यास डॉ. कटपाटल आणि वातावरण अभियांत्रिकीचे विकास पटेल आणि प्रकाश टकसाळ यांनी केला होता. यासाठी सन २०१६-२०१९ या चार वर्षातील २५ मार्च ते २५ एप्रिल या एका महिन्यातील एरोसोल प्रमाणाचा अभ्यास करण्यात आला होता.

नोव्हेंबर

  एसओ2 एनओ2 पीएम10
सिव्हिल लाइन्स १७ १५ १४०
अंबाझरी रोड १५ ४३ १३५
एमआयडीसी हिंगणा १७ ५२ १०३
सदर १६ ४८ १३६


एप्रिल

  एसओ2 एनओ2 पीएम10
सिव्हिल लाइन्स १२ ४७
अंबाझरी रोड १४ ८०
एमआयडीसी हिंगणा १५ ८५
सदर १३ ७१


संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT