The first installment of Rs 15 crore for upgrading of Super 
नागपूर

देवेंद्र फडणवीसांनी केल्या नुसत्या घोषणा; अंमलबजावणी ठाकरे सरकारकडून

केवल जीवनतारे

नागपूर : गरिबांच्या हृदयावर, किडनीसह पोटाच्या आणि मेंदूच्या विकारांवर सुपर स्पेशालिटी वरदान ठरले आहे. फडणवीस सरकारने सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटींची घोषणा २०१७ मध्ये केली होती. मात्र, त्यांनी कवडीही दोन वर्षांत सुपरला दिली नाही. ही बाब दै. सकाळने प्रकाशात आणली. ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या त्या घोषणेची अंमलबजावणी करीत १५ कोटींचा पहिला हप्ता सुपरच्या तिजोरीत जमा केला आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने मेडिकल, सुपर आणि मेयोच्या विकासासाठी घोषणांचा पाऊस पाडला. मात्र, यातील एकही घोषणा पूर्ण केली नाही. १०० कोटींपैकी पहिल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये २० कोटी आणि २०१९ मध्ये २० कोटी देण्यात येतील, असे म्हटले होते. २०१७ ते २०१९ या कालावधीत ४० कोटी तत्कालीन भाजप सरकारने देणे अपेक्षित होते, परंतु एक रुपया दिला नाही.

पहिल्या टप्प्यातील निधीतून सुपरच्या प्रत्येक विभागांत पाच खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात येईल. अशाप्रकारे सात विभागात एकूण ३५ खाटांच्या अतिदक्षता विभाग तयार होणार होते. महाविकासआघाडी सत्तेवर आल्यानंतर दै. सकाळने सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटीची घोषणा हवेत असे वृत्त प्रकाशित केले. यानंतर पाठपुरावा करीत सुपरच्या ३५ खाटांचा अतिदक्षता विभाग १०० कोटीअभावी कागदावरच असे वृत्त प्रकाशित केले.

या वृत्ताची दखल घेत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दै. सकाळच्या वृत्ताचे कात्रण सादर केले. याची दखल घेत विद्यमान राज्य सरकारने १०० कोटीतील पहिला १५ कोटीचा निधी सुपरच्या तिजोरीत जमा केला आहे. यातून खरेदी करण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचे नियोजन अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह इतर अधिकारी करणार असल्याची माहिती आहे.

६० रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण
सुपर स्पेशालिटीत दिवसाला पाचशेवर रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. येथे उभारलेले किडनी प्रत्यारोपण केंद्र गरिबांसाठी वरदान ठरले आहे. आतापर्यंत सुमारे ६० रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण झाले. सुपरच्या विकासासाठी सरकारने १५ कोटींचा निधी दिला आहे. यातून रुग्ण हित लक्षात घेत विविध यांत्रासह आवश्यक बाबींवर खर्च करण्यात येतील. जेणेकरून याचा लाभ गरीब रुग्णांना मिळेल. 
- डॉ. सुधीर गुप्ता,
अधिष्ठाता, मेडिकल-सुपर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : दुबईची बंदरे कुलूपबंद; मागणी असूनही नाशिकचा कांदा-द्राक्षे पडून!

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

Khadakwasla Bridge: खडकवासला पुलाचे काम अंतिम टप्प्यात, २६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला

Latest Marathi News Live Update : आखाती देशात अडकलेल्या कोल्हापूरकरांसाठी प्रशासन सज्ज

Lasalgaon Onion Market : निर्यात घटली, भाव कोसळले! लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले

SCROLL FOR NEXT