नागपूर

पहिला चित्र संग्राहक मिलिंद लिंबेकर: उभारली आर्ट रिस्टोरेशन व कंझरर्वेशन प्रयोगशाळा

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

कलेशी प्रामाणिक राहून आपल्यातील सुप्त गुण इतरांना वाटणारे देखील या क्षेत्रात आहेत.

नागपूर : कला विषयाशी निगडित असलेल्या अनेकांचे नाते ‘मी’पणाशी घट्ट बांधल्या गेलेले असते. ‘मी’ किती छान, ‘मी’च किती अनोखा हे सांगण्यात ते विसरत नाही अन् कचरतही नाही. मात्र, कलेशी प्रामाणिक राहून आपल्यातील सुप्त गुण इतरांना वाटणारे देखील या क्षेत्रात आहेत. असाच एक कलावंत शहरामध्ये दडला असून थोर कलावंतांनी रेखाटलेल्या दोन हजार चित्रांचा संग्रह करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवत आहे. मिलिंद लिंबेकर असे या चित्रकाराचे नाव.

जुन्या पिढीतील नाट्य कलावंत, संगीतकार वसंतराव लिंबेकर आणि गायिका, अभिनेत्री वनिता लिंबेकर या कलावंत दांपत्याच्या पोटी जन्माला आलेले मिलिंद यांची नाळ कलेशी जोडली नसती गेल्यास नवलच. मिलिंद यांना लहानपणा पासूनच हुबेहुब पानांवर उतरणाऱ्या चित्रकारांच्या चित्रांविषयी कुतूहल होते. याच आकर्षणापोटी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व १९९४ साली या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, मास्टर ऑफ फाइन आर्ट (नागपूर) आणि १९९७ साली बडोद्याहून आर्ट क्रिटीसिजन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या आईने कर्ज काढून त्यांना शिकविले. बडोद्यामध्ये चित्रकार अन् कलेचा मोठा सहवास लाभल्याने त्यांचे मन नागपूरमध्ये रमत नव्हते. त्यामुळे, त्यांच वर्षी त्यांनी मद्रास येथील ‘चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेज’ गाठायचे ठरविले आणि तोच त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला. या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांनी अनेक चित्रे लिहिली, ती उत्तम किमतीत विकल्या गेली. याच ठिकाणी त्यांना हॉलिवूडच्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. काही चित्रपटांसाठी काम केल्यानंतर आपली मुळ, चित्रकले विषयी दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी चित्रकलेवरच पूर्णवेळ लक्ष ठेवायचे असा निर्णय घेतला. काही काळ मुंबईत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सदानंद बाकरे यांचा सहवास लाभला. २००५ साली त्यांनी मुंबई सोडली आणि नागपूरला स्थलांतर झाले.

कला संग्रह वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी नामवंत चित्रकार हुसेन, सुझा, रझा, जेमिनी, रॉय, सोमनाथ होर अशा दिग्गज पाचशे चित्रकारांची चित्रे त्यांनी संग्रहित केली. याचे जतन व्हावे या उद्देशाने प्रतापनगर मधल्या टेलिकॉम कॉलनी येथील पारस पॅराडाईज इमारतीमध्ये आर्ट रिस्टोरेशन व कंझरर्वेशन प्रयोगशाळा सुरु केली. शिवाय, ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह सर्जना निर्माण या उपक्रमातून जगविख्यात चित्रकारांसह त्यांच्या चित्रकारांना उलगडत आहेत. यामुळे, चित्रकलेचे जतन होत असून नव्या चित्रकारांना रोजगार देखील उपलब्ध होतो आहे. यामध्ये, चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी दीपाली यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे.

कलावंतांसाठी ‘कलाश्रय’

कला विषयात शिक्षण घेणारे अनेक कलावंत जिल्ह्याच्या ग्रामिण भागातून येतात. कला साहित्य भेट देत त्यांना अनेक जण मदत करतात. मात्र, वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास त्यांना आर्थिक फटका बसतो. अशा कलावंतांना ‘कलाश्रय’ उपक्रमाच्या माध्यमातून ते वैद्यकीय मदत पुरवीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT