dead fishes 
नागपूर

काय सांगता! पाण्यातच गुदमरून मरताहेत अंबाझरी तलावातील मासे; नागपूर मनपाचे मात्र दुर्लक्ष

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : हिंगणा येथील एमआयडीसीतून वाहणाऱ्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे अंबाझरी तलावातील माश्यांना धोका निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचे मासे मरण पावले आहेत. या मृत माश्यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून, नागरिकांच्या आरोग्याला नुकसान पोहोचत आहे. या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाझरी परिसरात असलेल्या कारखान्यांतील खराब पाणी अंबाझरी तलावात सोडण्यात येते. अंबाझरीतील पाण्याला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कारखानदारांना फिल्टर प्लांट लावण्यास सांगितले होते. मात्र कारखानदारांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एरवी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे दूषित पाणी ओव्हरफ्लोद्वारे निघून जात असल्याने फारसा फरक पडत नाही. मात्र उन्हाळामध्ये पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर हे दूषित पाणी तळाला थांबते.

त्यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी होऊन तलावातील जीवजंतू विशेषतः मासे गुदमरून मृत्यू पावले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडोंच्या संख्येने मोठमोठे मौल्यवान मासे मरण पावल्याने पर्यावरणप्रेमींनी सांगितले. मृतावस्थेतील मासे पाण्यावर तरंगून तलावाच्या काठावर जमा होत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. नियमित स्वच्छता होत नाही.

"मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

तलावात दररोज अनेक हौशी व व्यावसायिक जलतरणपटू सराव करतात. दुर्गंधीमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय जलपर्णीसारखी वनस्पतीही या तलावात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेही अंबाझरीचे सौंदर्य बाधित झाले असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अंबाझरी हा शहरातील चांगल्या तलावांपैकी एक आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने या तलावाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

' दूषित पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. गतवर्षीही असंख्य मासे मेले होते. यासंदर्भात मी वारंवार मनपा अधिकाऱ्यांशी बोललो. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. खरं तर यासाठी घाण पाणी तलावात सोडणाऱ्या कंपन्याच कारणीभूत आहेत. त्यांच्यावरच गुन्हा नोंदवायला पाहिजे. '
-तलावाचे ठेकेदार
'अंबाझरी तलाव नागपूरचा वारसा आहे. दुर्दैवाने याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. कारखान्यातील केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे दररोज मासे मारत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांसह जलतरणपटूंनाही बसत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, मनपाने याकडे लक्ष द्यावे एवढीच आमची अपेक्षा आहे. '
-संजय बाटवे, जलतरण प्रशिक्षक व पर्यावरणप्रेमी

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT