सराव करताना वानखेडे परिवारातील सदस्य. 
नागपूर

कुटुंब रंगलंय खेळात! लॉकडाउनचा केला सदुपयोग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे सध्या अनेकांना वेळ कसा घालवावा, हे सुचत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. असाच अनोखा प्रयोग सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत असलेला आणि भारतीय रेल्वेचा माजी रणजीपटू सुधीर वानखेडेच्या कुटुंबात सुरू आहे. चार खेळाडूंचा समावेश असलेल्या या परिवारातील सदस्यांनी घराच्या गच्चीवर फिटनेस क्‍लास भरवून लॉकडाउनचा सदुपयोग करीत समाजाला अनोखा संदेश दिला आहे.


महाल कोठी रोड परिसरात राहणारा सुधीर हा रणजी विजेत्या रेल्वेचा संघाचा सलामी फलंदाज आणि यष्टिरक्षक होता. रणजीच्या अंतिम सामन्यात शतक झळकविण्याचा मान त्याच्या नावावर आहे. एकेकाळी तो भारतीय संघातील यष्टिरक्षक म्हणून दावेदार होता. नागपुरातच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत असलेला त्याचा भाऊ शशांक हाही एकलव्य क्‍लबचा राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू आहे. शिवाय सुधीरचा मुलगा सिद्धांत व मामेभाऊ (सुमित डवरे) हेदेखील प्रतिभावन कबड्डीपटू आहेत. सकाळ-सायंकाळ सराव करणे हा दोन्ही भावांचा शिरस्ता. सुधीर कधी रेशीमबाग मैदानावर तर कधी व्हीसीएवर सरावला जात असे. मात्र, लॉकडाउनमुळे हा नित्यक्रम थांबला.

लॉकडाउनमुळे सध्या घराबाहेर सरावाला जाता येत नसल्याने चौघेही सध्या घरातच वर्कआउट करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहे. सुरुवातीला सुधीर व त्यांचा मुलगा फिटनेस करतो. त्यानंतर घरातील इतर सदस्य यात जॉइन होतात. सुधीरची पत्नी साधनाचाही यात सक्रिय सहभाग असतो. जवळपास दोन ते तीन तास त्यांचा फिटनेस क्‍लास सुरू असतो. उल्लेखनीय म्हणजे, सर्व जण "सोशल डिस्टन्सिंग'चा नियम प्रकर्षाने पाळतात. त्यांचा हा वेगळा उपक्रम बघून शेजारीही आता आपापल्या घरी फिटनेस करू लागले आहेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा फिटनेस तर राखला जातोच, शिवाय एकमेकांशी "बॉंडिंग'ही राखले जात असल्याचे सुधीरने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंसह तिघांवर गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त करून घरी सोडलं; अटक का नाही? कारण समोर

Sanjay Dutt UP Election: संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा फोटो व्हायरल

Gold Rate Today: कालच्या वाढीनंतर सोन्याच्या भावात अचानक घसरण! चांदीचीही चमक फिकी; सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Supreme Court: इतर मुस्लिम ओबीसींचे काय? सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा आरक्षण मागणाऱ्या वकिलाला प्रश्न

T20 World Cup: ३१ षटकार अन् ४०१ धावा... वानखेडेवर WI vs NED सामन्याने घडवला इतिहास; एकाच मॅचमध्ये ३ विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT