Five and a half thousand wild animals roam freely through the underpass 
नागपूर

‘अंडरपास’चा सर्वाधिक वापर केला हरणांनी; साडेपाच हजार वन्यप्राण्यांचे बिनधास्त भ्रमण

राजेश रामपूरकर

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या नागपूर ते जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटर क्षेत्र परिसरात बांधण्यात आलेल्या ‘अंडरपास’मधून मागील दहा महिन्यांत सुमारे पाच हजार ४५० वन्यप्राणी गेल्याचे समोर आले आहे. ८९ वेळा या ‘अंडरपास’चा वापर वाघाने रस्ता ओलांडण्यासाठी केला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने या ठिकाणी ७८ कॅमेरे लावले आहेत. या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडणाऱ्या वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्या, हा मुद्दा राज्य तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अनेकदा समोर आला. या खबरदारीच्या उपाययोजना कशा असाव्यात याबाबत अभ्यासाची जबाबदारी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली.

वन्यप्राण्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी महाराष्ट्रातील नागपूर ते जबलपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल तसेच पाच ‘अंडरपास’ तयार करण्यात आले. केवळ वन्यप्राण्यांसाठी केली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. वन्यप्राणी याचा वापर सुरक्षितरीत्या करतात किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सुमारे ७८ कॅमेरा ट्रॅप या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

मार्च ते डिसेंबर २०१९ या काळात या ठिकाणी किती वन्यप्राण्यांनी याचा वापर केला हे पाहण्यासाठी कॅमेरा ट्रॅप’वरून माहिती घेतली असता एक लाख ३२ हजार ५३२ छायाचित्र त्यातून मिळाले. या ‘अंडरपास’चा सर्वाधिक वापर तीन हजार १६५ वेळा हरणांनी केले आहे.

११ स्वतंत्र वाघांची नोंद

६७७ वेळा रानडुक्करांनी त्याचा वापर केल्याचे दिसून आले. रानमांजर, ससे, साप यासारख्या प्राण्यांनीदेखील त्याचा वापर केल्याचे या अहवालातून लक्षात आले. ११ स्वतंत्र वाघांची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT