five thousand people get blind due to fire crackers every year  
नागपूर

धक्कादायक आकडेवारी! फटाक्‍यांमुळे दरवर्षी हजारो लोकांना येतं अंधत्व; डोळे जपण्याचा डॉक्टरांचा सल्ला 

केवल जीवनतारे

नागपूर ः दिवाळीत नकळत होणाऱ्या चुकांतून फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा होते. अंधत्व येण्याची भिती असते. भारतामध्ये फटाक्‍यामुळे पाच हजार व्यक्ती दरवर्षी अंध होतात. जगभरात पाच लाख लोक फटाक्‍यामुळे अंध होत असून यात पन्नास टक्के लहान मुले असतात, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागप्रमूख डॉ. अशोक मदान यांनी दिली.

दिवाळीत फोडलेल्या फटाक्‍यामध्ये चारकोल, गंधक, नायट्रो क्‍लोरेट, परफलोरेस्टसह इतरही घातक घटक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुरातून फुप्फुसांवर परिणाम होतो. यामुळे फटाक्यांपासून दूर राहावे. याशिवाय त्वचाविकारातही वाढ होण्याची भिती आहे. फटाक्‍यांचा तेजोमय उजेड आणि फटाके फोडलेल्या ठिकाणचे तापमान ४०० ते ५००० पर्यत वाढते, धूर निघतो. 

आवाजाचे अर्थात ध्वनिप्रदूषण, जल प्रदूषण, वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा झाल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची भिती असते. गंभीर दुखापतीमुळे डोळा काढावा लागू शकतो. दिवाळीच्या सणांत नकळत बाधित व्यक्तींपैकी ६० व्यक्ती २० वर्षाखालील असतात. ८० टक्के पुरुष असतात. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्‍यांमध्ये प्रामुख्याने अनार, सुतळीबॉम्ब आणि चक्री आणि रॉकेटचा समावेश असतो.

नकळत फटाके फोडताना डोळ्याला इजा झाल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे चोळल्यास डोळ्यातीलद्रव्य बाहेर येऊ शकते. डोळ्यातील फसलेले कण आत खोलवर जाऊ शकते. त्यामुळे डोळा खराब होऊ शकतो. पाण्याने डोळा धुऊ नये. तसे केल्यास जंतुसंसर्ग वाढतो. डोळ्यांमध्ये मलम टाकू नये, त्वरित नेत्र रोगतज्ज्ञांना दाखवावे असं डॉक्टरांनी सांगितलंय. 

फटाके फोडताना लक्ष द्यावे

- फटाक्यांपासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे.
. पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे
- मोकळ्या जागेत फटाके फोडावे.
- शक्‍यतो सुती कपडे घालावे.
- रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू नये
-ध्वनिप्रदूषण करणा-या फटाके फोडू नये
-प्रकाश देणाऱ्या फटाक्‍यांचा वापर करावा.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT