Flower market is down causes financial loss to farmers 
नागपूर

फिर कब छिडेगी बात फुलों कि...फुलशेती करणा-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

राजेश प्रायकर

नागपूर : लॉकडाऊनमुळे फुलांचा व्यवसायच बंद पडल्याने फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शहराला लागून असलेल्या तीन गावातील आठशे एकरांतील बहरलेली फूलशेती कोमेजली असून गेल्या चाळीस दिवसांत शंभरावर शेतकऱ्यांचे सहा कोटींचे नुकसान झाले. आणखी काही दिवस स्थिती पूर्व पदावर येण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

मानवी जीवनाशी, त्याच्या भावभावनांशी फुलांचे नाते आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात सुख-दु:खाच्या क्षणी  व्यक्त होण्यासाठी फुलांची साथ लागते. परंतु लॉकडाऊनमुळे फुलांचा व्यवसायच बंद पडल्याने फुलांची शेतीच अडचणीत आली. लग्नसराईमध्ये मंगल कार्यालये, हॉटेल, सभागृह सजविण्यासाठी  मोठ्या प्रमाणात फुले विकली जात होती.  याशिवाय एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असतात. कोरोनामुळे लग्न समारंभ स्थगित झाले. परिणामी फुलांचा व्यवसाय थांबला. याचा परिणाम शहराला लागून असलेल्या पावणगाव, पूणापूर, भरतवाडा येथील आठशे एकरांतील फुलशेतीवर झाला. मन प्रसन्न करणारी फुले गेल्या चाळीस दिवसात कोमेजली. अजून बरीच फुले शेतात आहेत. परंतु मागणीच नसल्याने तीही कोमेजणार आहेत. या शेतात लिली, कलर, डीजी व झेंडूची फुले आहेत. व्यापाऱ्यांना पुरविण्यासाठी तोडून ठेवलेली फुले सडली. आता फुलांचा व्यवसाय बंद असल्याने दररोज 15 लाखांचे नुकसान होत असल्याचे भरतवाडा येथील शेतकरी दिनेश मुळे यांनी सांगितले. गेल्या चाळीस दिवसांत सहा कोटींचे नुकसान झाल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

नुकसानभरपाईची मागणी

या तिन्ही गावातील शंभरावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फूलशेतीवर आहे. आतापर्यंत फूल मार्केट सुरू होईल या अपेक्षेने फूल तोडण्यासाठी खर्च केला. परंतु हा खर्चही वाया गेला. आता शेतात असलेले फुलांचे उत्पादनही जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.

रोज हजारोंचे नुकसान
माझी आठ एकर फुलशेती आहे. लिली, कलर या फूलातून दररोज वीस हजारांचे उत्पन्न होते. परंतु गेल्या 22 मार्चपासून फूल मार्केट बंद झाल्याने रोजचे 20 हजारांचे नुकसान होत आहे. सरकारने फूल मार्केट सुरू करावे.
दिनेश मुळे, फूल उत्पादक शेतकरी, भरतवाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

SCROLL FOR NEXT