biometric
biometric 
नागपूर

कार्यालयात पोहोचा वेळेत...नाहीतर होणार पगार कपात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला असून त्यांच्या दररोजच्या कामाची वेळा 45 मिनिटांनी वाढविली आहे. त्यांना नियमित बायोमेट्रीक यंत्रावर बोटाचा ठसा उमटवायचा आहे. मात्र तीन दिवस उशीर आढळून आल्यास त्यांची एका दिवसाची किरकोळ रजा कमी करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांना दिल्यात.

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा लागू केला. 29 तारखेपासून यावर अंमल होणार आहे. जिल्हा परिषदेने 24 फेब्रुवारीपासून यावर अंमल करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळा पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यापुढे सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरीपटाऐवजी बायोमेट्रीक यंत्रावरून होईल. सर्व विभागांमध्ये बायोमेट्रीक यंत्र आवश्‍यक केले आहे. विशेष म्हणजे विभाग प्रमुखांना वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर टाकली आहे. परिणामी, कोणताही कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेत येणार नाही व वेळेपूर्वी कार्यालय सोडतील, अशा प्रकारणी वेळीच दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रत्येक कार्यालय प्रमुख कार्यालयीन उपस्थितीबाबत आणि त्या अनुषंगाने केलेल्या कारवाहीचा अहवाल दर महिन्यात सादर करणे बंधनकारक केले आहे. तीन दिवस उशीर झाल्यास एक दिवसाची किरकोळ रजा कमी करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना वर्षाला आठ किरकोळ रजा मिळतात. या नियमाची काटेकोरपणे अंमजबजाणी करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत.

अधिकारीच पाळत नाही वेळ
शासनाने पाच दिवसांचा आठवडा करताना शासनाच्या कामात बदल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडूनच कामाच्या वेळा पाळल्या जात नसल्याचे सांगण्यात येते. अधिकारीच वेळेत येत नसल्याने कर्मचारीही मनमानीप्रमाणे येत असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Latest Marathi News Update : दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

SCROLL FOR NEXT