foreign student can give online PET of RTM nagpur university  
नागपूर

आता विदेशी विद्यार्थ्यांनाही देता येणार 'ऑनलाइन पेट', २४ एप्रिलपर्यंत करता येईल नोंदणी

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पीएच.डी.अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'प्रवेश पूर्व परीक्षा'चे (पेट) १० ते १५ मेदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यासाठी २४ एप्रिलपर्यंत नोंदणी करावयाची आहे. मात्र, अनेक विदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे पीएच.डी करण्याची इच्छा असल्याने त्यांच्यासाठी विद्यापीठाद्वारे 'ऑनलाइन पेट' देण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

विद्यापीठातील पाली व प्राकृत अभ्यासक्रम करण्यासाठी बौद्ध अनुयायी देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. त्यात दुबई, म्यानमार, भुटानसाख्या देशातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पीएच.डी. करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, विद्यापीठाद्वारे पीएच.डी. अभ्यासक्रमात प्रवेशासाठी 'पेट' देणे आवश्यक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठाद्वारे 'ऑनलाइन पेट' देण्याची सोय करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचेशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले. याशिवाय महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठीही अशी सोय उपलब्ध करून देण्यावर विचार सुरू असल्याचे सांगितले. 

२,२३० विद्यार्थ्यांची नोंदणी -
विद्यापीठाद्वारे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या पीएच.डी.च्या ऑनलाइन नोंदणीत बुधवारपर्यंत २ हजार २३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना २४ एप्रिलपर्यंत https://nagpur.university/PHDPortal नोंदणी करता येणार आहे. यापैकी ७२० विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून इतरांनी आपला अर्ज निश्चित केला आहे. 

'पेट'साठी महत्त्वाचे - 

  • पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुण (प्रवर्गासाठी ५० टक्के) 
  • नेट-सेट, एम.फील ला 'पेट'ची आवश्यकता नाही 
  • १०० गुणांची परीक्षा 
  • परीक्षा दोन भागात होणार (पहिला भाग रिसर्च मेथॉडॉलॉजी, दुसरा जनरल अ‌ॅप्टिट्यूड) 
  • दोन्ही भागावर ५०-५० प्रश्न (प्रत्येकी १ गुण) 
  • वेळ ९० मिनीट 
  • इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये देता येणार परीक्षा 
  • दोन्ही भागात ४० टक्के व संयुक्तरित्या ५० टक्के गुण आवश्यक 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT