नागपूर

विमानामुळे आमदारकीला मुकलेले सुबोध मोहिते राष्ट्रवादीत

राजेश चरपे

नागपूर : माजी केंद्रीय मंत्री तसेच रामटेकचे माजी खासदार सुबोध मोहिते (Former MP Subodh Mohite) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत दाखल (Subodh Mohite joins NCP) झाले. त्यांच्या प्रवेशाने विदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणखी भर (Further increase in NCP leaders in Vidarbha) पडली आहे. मूळचे शिवसैनिक असलेल्या मोहिते यांनी सेना, काँग्रेस, शिवसंग्राम त्यानंतर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना असा आजवर विविध पक्षात राजकीय फेरफटका मारला आहे. (Former-Union-Minister-Subodh-Mohite-join-NCP)

शिवसेनेत असताना ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते. मात्र, शिवसेना प्रमुखांसोबत बिनसल्याने त्यांनी मध्येच खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रामटेक लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत नारायण राणे यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. मात्र, कट्टर शिवसैनिक असलेल्या प्रकाश जाधवांनी त्यांना धूळ चारली होती. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख उतरला. रामटेक विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, थोड्याफार मतांच्या फरकाने ते पराभूत झाले होते.

एनटीपीसी प्रकल्पाचे शिल्पकार

केंद्रात अवजड उद्योगमंत्री असताना मोहिते यांनी एनटीपीसीचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प मौदा येथे खेचून आणला होता. ही त्यांची नागपूर जिल्ह्यासाठी मोठी उपलब्ध आहे. या प्रकल्पाची घोषणा केली तेव्हा मोहिते थापा मारत असल्याचा आरोप विरोधक करीत होते.

विमानामुळे परिषदेची संधी होती हुकली

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोहिते यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी मोहिते नागपूरला होते. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईला बोलवण्यात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाच ते सात तासांचाच अवधी होता. मुंबईचे विमान उपलब्ध नसल्याने ते विमानाने पुण्याला रवाना झाले. तेथून ते चारचाकी वाहनाने मुंबई गाठणार होते. मात्र, त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात होत्या. त्या दिल्लीला जाणार असल्याचे नागपूरचे विमान पुण्याला उतरण्यात विलंब झाला होता. त्यामुळे मोहिते यांची संधी हुकली होती.

(Former-Union-Minister-Subodh-Mohite-join-NCP)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT