file photo 
नागपूर

या कारणाने बंद होणार राज्यातील साडेचार हजार शाळा; शिक्षकांचे भविष्यही अधांतरी

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वारंवार पटसंख्या कमी होत असल्याचे शिक्षकांना अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. हे संकट अधिक गडद होणार असून, नव्या शैक्षणिक वर्षात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील 4 हजार 690 शाळा बंद करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत आहे. या शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. मात्र, असे असले तरी पुन्हा एकदा बऱ्याच शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आलेली आहे. 

राज्यात जवळपास पन्नास हजारांवर जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. एकट्या शाळेत नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत 1500 हून अधिक शाळांचा समावेश आहे. बऱ्याच शाळांमध्ये सोयीसुविधा नसल्याने नजीकच्या खासगी शाळांमध्ये पालकांची पसंती दिसून येते. यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेतील शाळांमधील पटसंख्या सातत्याने कमी होऊ लागली आहे. शाळेतील शिक्षकांवरही अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये विजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या सोयी नाहीत. दुसरीकडे स्टेशनरीचाही खर्च शिक्षकांना त्यांच्या पगारातूनच करावा लागतो.

यामुळेच बऱ्याच शाळांमध्ये 10 पेक्षाही पटसंख्या असल्याचे दिसून येते. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शिक्षक शाळेच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये विद्यार्थी शोधण्यासाठी फिरत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी फिरता येणे शक्‍य झाले नाही. यातूनच पटसंख्या कमी होण्याची शक्‍यता आहे. यातूनच या शाळांना नजीकच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यातील 700 शाळांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात 573 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 441 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत 128 शाळांचा समावेश आहे. 
 
गेल्या वर्षीही हजारावर शाळांचा प्रस्ताव 
राज्यात यावर्षी साडेचार हजारांवर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षीही जवळपास हजारावर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यात नागपूर जिल्ह्यातील 16 शाळांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. 

अशी आहे शाळांची संख्या 
नागपूर - 128, रत्नागिरी - 700, रायगड - 573, सिंधुदुर्ग - 441, अकोला- 55, अमरावती - 121, औरंगाबाद - 62, भंडारा - 29, बीड - 102, बुलढाणा - 24, चंद्रपूर - 133, धुळे -12, गडचिरोली - 384, गोंदिया - 63, हिंगोली -33, जळगाव - 21, कोल्हापूर - 141, जालना- 26, लातूर - 54, नंदूरबार -33, नाशिक- 94, उस्मानाबाद - 27, पालघर - 60, परभणी - 28, पुणे - 378, सातारा - 370, सोलापूर - 44, ठाणे - 72, वर्धा 73, वाशीम- 28, यवतमाळ - 71, नांदेड - 133. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT