मनाली : लॉकडाउनमुळे मनालीत अडकून पडलेले सीएसी ऑलराउंडरचे संदेश दांडेकर, अजय अहिरकर, सोनू आगलावे व शिरीष देशमुख.
मनाली : लॉकडाउनमुळे मनालीत अडकून पडलेले सीएसी ऑलराउंडरचे संदेश दांडेकर, अजय अहिरकर, सोनू आगलावे व शिरीष देशमुख. 
नागपूर

लॉकडाउनमुळे नयनरम्य ठिकाणी अडकले नागपूरचे प्रशिक्षक तरीही घरी परतण्याची ओढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. अडकलेल्या ठिकाणांहून घरी परतण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करीत आहे. त्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे कोण कधी घरी परतणार, हे सांगणे कठीण आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नागपुरातील सीएसी ऑलराउंडर संस्थेचे चार प्रशिक्षक मनाली येथे उन्हाळी साहसी शिबिरासाठी गेले होते. सर्व काही सुरळीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे सीएसी ऑलराउंडर या प्रशिक्षण संस्थेचे चार प्रशिक्षक (इन्स्ट्रक्‍टर) एक महिन्यापासून मनाली (हिमाचल प्रदेश) येथे अडकून पडले आहेत. मनाली, रोहतांग पास, सोलंग व्हॅली हा परिसर अतिशय नयनरम्य असून, येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. तरीही लॉकडाउन असेपर्यंत आता हे प्रशिक्षक घरी परतण्याची शक्‍यता कमी आहे.

सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संस्थेचे संदेश दांडेकर, अजय अहिरकर, सोनू आगलावे व शिरीष देशमुख हे चार प्रशिक्षक दरवर्षी होणाऱ्या उन्हाळी साहसी शिबिराच्या तयारीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मनालीला गेले होते. महिनाभरानंतर एप्रिलमध्ये ते नागपूरला परत येणार होते. मात्र, कोरोनामुळे अचानक लागलेल्या लॉकडाउनमुळे चारही जण तिथेच अडकून पडले. आपापल्या घरी परतण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. परंतु, प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे ते इच्छा असूनही येऊ शकत नाही. सध्या लॉकडाउन असल्यामुळे आम्हीही हतबल आहोत. आम्ही हिमाचल प्रदेश सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांना खासगी वाहनाने परत पाठविण्याची विनंती केली. परंतु, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन असल्यामुळे त्यांनीही असमर्थता व्यक्‍त केली.

खंते म्हणाले, आमची "कॅम्प साइट' मनालीपासून दहा किमी अंतरावर आहे. सुदैवाने या अडचणीच्या काळात स्थानिक रहिवासी त्यांची मदत करीत आहेत. त्यांना आवश्‍यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. जवळपास दीड महिन्यापासून घराबाहेर असल्यामुळे सर्वांना घरची आठवण येत आहे. त्यांचे कुटुंब नागपुरात आहेत. त्यांना भेटण्यासाठी ते उत्सुक आहेत. मात्र, लॉकडाउन पुन्हा वाढल्याने त्यांचा मनालीतील मुक्‍काम आणखी दोन आठवडे लांबणीवर पडला आहे.

मनाली जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये असून, येथे सर्व "ऍक्‍टिव्हिटीज' नियमित सुरू आहेत. आम्हाला घरची खूप आठवण येत आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतमध्ये फॉर्मही भरून दिला आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याकडून अद्याप कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्यातरी आम्ही वाऱ्यावर आहे. "वेट ऍण्ड वॉट'शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.
-संदेश दांडेकर, प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT