corona 
नागपूर

चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू! राज्यात आजवर १६९ पोलिसांचा गेला बळी

अनिल कांबळे

नागपूर : शहर पोलिस दलात कोरोनाचा फास अधिक घट्ट होत असून शनिवारी चार पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी चार कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातारण आहे. मृत कर्मचाऱ्यामध्ये नागपूर ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. आतापर्यंत नागपुरमध्ये १० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सक्करदरा पोलिस स्टेशनमधील नायक पोलिस शिपाई प्रवीण साहेबराव सूरकर (वय ४३ ,रा. जम्बुदीपनगर ) यांची १ सप्टेंबरला प्रकृती खालावली. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मागे पत्नी शीतल, मुलगा रोहित ,मुलगी शानवी आहे. पोलिस मुख्यालयातील महिला हेडकॉन्स्टेबल वत्सला राजू मसराम (वय ५४, रा.राजीवनगर पांढराबोडी) यांची ३१ ऑगस्टला प्रकृती खालावली. त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती , मुलगी दीपाली आहे. गणेशपेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पंढरीनाथ मडावी (वय ५२,रा.नवीन क्वॉटर्स,झिंगाबाई टाकळी) यांची २ सप्टेंबरला प्रकृती खालावली. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी मैना, मुलगा प्रतीक, दोन मुली मोनाली व मिताली आहेत. याचप्रमाणे नागपूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत सुनील बाबूराव सेलुकर यांचाही वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वाचा - गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भूखंड माफियांविरुद्ध मोठे विधान.. म्हणाले..

राज्यात १६९ पोलिसांचा गेला बळी
राज्य पोलिस दलात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६९ वर गेली आहे. तर जवळपास ११ पोलिस कर्मचारी कोरोना रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे गृह विलगिकरणात आहेत. नागपूर शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात कोरोना पोहोचला आहे. शहरातील जवळपास १५०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती आहे.
संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT