fraud in contracts of coal treatment plant of Koradi power plant  
नागपूर

कोळसा हाताळणी विभागाच्या कंत्राटात काळेबेरे! कोराडी वीज केंद्राच्या कारभारावर ताशेरे

योगेश बरवड

नागपूर ः कोराडीतील ६६० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळसा हाताळणी विभागाच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कंत्राटासंदर्भातील पहिला प्रस्ताव डावलून दुसरा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रक्रियेवरून केंद्राच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरुपाचे ताशेरेही ओढले जाऊ लागले असून विशिष्ट कंपनीलाच कंत्राट मिळावे या हेतूने प्रक्रिया मॅनेज केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोराडी वीज केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात देखभाल दुरुस्तीसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट दिले जाते. महानिर्मितीच्याच अन्य प्रकल्पांसह केंद्र शासनाच्या ‘एनटीपीसी’ मध्ये याच विभागाचे कंत्राट किमान तीन विभागांमध्ये विभागून दिले जाते. केवळ कोराडी प्रकल्पासाठीच वेगळा न्याय का अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

यावर्षी जानेवारीच्या प्रारंभी संपणाऱ्या या कंत्राटाच्या नव्याने प्रक्रियेसाठी कोराडी प्रकल्पाकडून ऑक्टोबर महिन्यात मुंबई मुख्यालयाला रितसर प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावातही कंत्राट तीन विभागांमध्ये विभागून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच एकाच कंपनीला कंत्राट देण्याचे तोटे आणि येणाऱ्या अडचणीही नमूद करण्यात आल्या आहेत. 

प्रारंभी त्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून सकारात्मक शेराही देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नंतर कुणी मेख मारली हे सांगता येत नसले तरी वित्त विभागात हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला गेला. हा प्रस्ताव रखडल्ने ८ डिसेंबर रोजी दुसरा प्रस्ताव सादर केला गेला. त्यातील अटी व शर्थी विशिष्ट कंपनीच्या हिताच्या असल्याचा आरोप होत आहे.

या प्रक्रियेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही आक्षेप घेतला असून तसे निवेदनाही महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. ‘कोराडी एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन’ चे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी या प्रकारावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. कंत्राट तीन विभागांमध्ये विभागून स्वच्छ व पारदर्शक स्पर्धेतून दिले जावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT