Fraud Rs 2.5 crore the name of land two acres of land sakal
नागपूर

नागपूर : जमिनीच्या नावावर अडीच कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी येथील दोन एकर जमिनीची परस्पर विक्री करीत, अडीच कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मो. आरीफ अब्दुल शखुर (वय ६७ रा. जाफरनगर) आणि परिक्षित अलबर्ट (वय ५०, रा. केटीनगर, काटोल रोड) असी आरोंपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनदयाल देशराज यांच्या नावाने अजनी परिसरात दोन एकर जमीन आहे. त्‍यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि पाच मुली यांच्या नावावर ती करण्यात आली. यानंतर या जमीनीवर फ्लॅट स्कीम आणि दुकानांसाठी खोल्या काढण्याच्या उद्देशाने २००० साली वारसदारांनी बीजे कन्स्ट्रक्शनचे भास्कर रासेकर यांनी ही जमीन मो. आरीफ अब्दुल शखुर आणि प्रतिभा अलबर्ट यांच्यासोबत करारपत्र केले.

त्याबदल्यात प्रतिभा अलबर्ट यांनी रासेकर यांना २ कोटी ७४ लाख रुपये दिले. मात्र, मो. आरीफ अब्दुल शखुर आणि प्रतिभा यांनी करार मोडून २ कोटी ५ लाख ३० हजार ९० रुपयात जमिनीचे अधिकार प्रसिद्ध बिल्डर एन. कुमार यांना विकले. याशिवाय प्रतिभा अलबर्ट यांचा मुलगा परिक्षित यालाही विकले. विशेष म्हणजे, याबाबत कुठलीही माहिती त्यांच्या वारसदारांना देण्यात आली नव्हती.

दरम्यान याबाबत माहिती घेतली असता ती जमिन एन. कुमार यांच्या नावाने असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारसदारांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आर्थिक गुन्हे शाखेद्वारे याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली. त्यांनी केलेल्या तपासातून मो. आरीफ अब्दुल शखुर आणि परिक्षित अलबर्ट यांच्यावर बजाजनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT