fraud job sakal
नागपूर

नागपूर : ‘मेट्रो’मध्ये नोकरीच्या नावाने फसवणूक

चौघे अटकेत, खोटे नियुक्तीपत्रही दिले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात वाढत्या बेरोजगारीमुळे युवक हताश होत आहेत. अशा युवकांना हेरुन त्यांना नोकरीचे आमिष देत, युवकांना पैशांनी गंडविण्याची अनेक प्रकरण समोर येत आहे. त्यापैकीच शहरातील मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषातून अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील युवकाला अडीच लाखाने फसविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर पैसे लुबाडणारी टोळीच सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र नानाजी डाहे (वय ३७ रा. मोर्शी) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. २०१९ मध्ये त्याच्या जावयांच्या ओळखीच्‍या असलेल्या राजू ढोके, परमेश्‍वर वरठे, राजेश रोहिले, किशोर ढोणे (वर्धा)यांच्यासह एकाने मेट्रोमध्ये ज्युनिअर इंजिनिअर या पदावर नोकरी लावून देतो, असे सांगितले.

त्यासाठी अगोदर एक लाख देण्यास सांगितले. त्यामुळे २९ ऑगस्ट २०१९ ला त्याने एक लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याकडून आरोपींनी पैसे घेतले. मात्र, नोकरी लावून देण्याबाबत त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला नियुक्तीपत्र देत, नोकरी मिळाल्याचे सांगितले. त्या आधारे ते नियुक्तीपत्र घेवून तो मेट्रो कार्यालयात गेला. मात्र, त्याला देण्यात आलेले नियुक्तीपत्र हे खोटे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यातून त्याने सदर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करीत पोलिस हवालदार राजेश गिरडकर, अरविंद गडेकर आणि राहूल सावरकर यांनी तपास करुन गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणातील अनोखळी व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.

नेत्यांचे बनावट पत्र, अधिकाऱ्यांशी जवळीक

सध्या शहरातील मेट्रोमध्ये वेळोवेळी पद भरण्यात येत असल्याने त्या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी स्थानिक आमदार, मंत्र्यांच्या पत्राचा वापर केल्या जातो. हाच धागा पकडून फसवणूक करणाऱ्या टोळीने यापूर्वीही अनेकदा मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषातून काही तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. नेत्यांचे बनावट पत्र आणि परिसरातील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित असल्याचे सांगून तरुणांना नोकरी देण्याचे आमिष देण्यात येते. त्यातून त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्या जात असल्याचे दिसून येते.

अनेकदा आवाहन

मेट्रोमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला तरुण वारंवार बळी पडत असल्याने याबाबत अनेकदा महामेट्रो द्वारे वारंवार अशा व्यक्तींपासून सावधान राहण्याचे आवाहन करते. मात्र, त्यानंतरही असे प्रकार घडत असल्याने या टोळीचे हितसंबंध कुणाशी जुळले आहे, याबाबत चर्चेला उधान आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ आता इंटरनॅशनल क्रिमिनल, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव; इंटरपोल घेणार शोध, 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी...

Diwali Sale Online Scams: दिवाळी सेलच्या नावावर तुमच्या सोबत होऊ शकतो मोठा स्कॅम; ऑनलाईन फ्रॉडपासून कसे वाचायचे? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : उद्या रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली राहणार बंद, कारण काय?

Shivai E-Bus: लालपरी’ने पांघरला ‘हिरवा शालू’; अकोल्याच्या रस्त्यांवरून धावणार वातानुकूलीत इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस

'मेकअप उतरवल्यावर' केवळ आत्मचरित्र नव्हे... लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या संवेदनशील लेखनाचे रसिकांना आकर्षण

SCROLL FOR NEXT