Fresh vegetables are available here also in lockdown 
नागपूर

इथे मिळतोय लाँकडाऊनमध्येही ताजा भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना प्रतिबंधक उपायांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्येही शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला फळे व भाजीपाला शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.नागपूर विभागातील 220 शेतकरी उत्पादक गट दररोज सरासरी दीड ते दोन हजार क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. यासाठी शेतकरी उत्पादक गटांना विक्रीसाठी 223 जागा निश्‍चित करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे त्यामुळे साप्ताहिक बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेसह जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्‍चित करून दिल्या. त्याच जागेवर कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या फळांसह वांगे, मिरची, टोमॅटोपासून सर्व भाजीपाला व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो. परंतु टाळेबंदी लागू असल्यामुळे बाजार समित्या तसेच दैनंदिन भाजी बाजारांवर निर्बंध आले आहे. भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळणे आवश्‍यक असल्यामुळे विकेंद्रित स्वरुपात शहरातील मोकळया मैदानावर भाजी व फळे विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नागपूर शहरात 38 वार्डामध्ये शेतकरी उत्पादक गटामार्फत फळे व भाजी विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नागपूरसह विभागातून शेतकरी उत्पादक गटामार्फत फळे व भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना शेतातील ताजी फळे व भाजीपाला उपलब्ध झाला असल्याची माहिती कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिली.
विभागात फळे व भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत 220 शेतकरी उत्पादक गटांनी लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना ताजी फळे-भाजीपाला उपलब्ध होत आहे. यासाठी 223 जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. दररोज सरासरी 31 हजार 504 क्विंटल फळे-भाजीपाल्याची विक्री होत आहे.
कृषी उत्पादन बाजार समिती आठवडी बाजार तसेच प्रचलित बाजारांच्या माध्यमातून होणारा शेतमाल पुरवठा, वाहतुकदार, हमाल यांच्या उपलब्धतेमुळे विस्कळीत झाला होता. त्यामुळे शेतकरी उत्पादक गट यांच्यामार्फत थेट ग्राहकांपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने निश्‍चित केलेल्या ठिकाणी शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT