friend killed friend after drinking alcohol over bad words against sister Ambazari nagpur crime sakal
नागपूर

Nagpur Crime : दारू पिऊन मामेबहिणीबाबत अपशब्द काढल्याने मित्राने मित्राला केले ठार; अंबाझरीतील घटना

दारू पिऊन मामे बहिणीबाबत अपशब्द काढल्याने दुसऱ्या मित्राने साथीदाराच्या मदतीने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर गट्टुने वार करीत खून केला. ही घटना सोमवारी (ता.३०) रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दारू पिऊन मामे बहिणीबाबत अपशब्द काढल्याने दुसऱ्या मित्राने साथीदाराच्या मदतीने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर गट्टुने वार करीत खून केला. ही घटना सोमवारी (ता.३०) रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली.

सागर नकुल नागले उर्फ टूना (वय २७, रा, सुदामनगरी, पांढराबोडी) असे मृताचे नाव असून वीर विनोद थापा (वय १८), अजित संतन नेताम (वय २६), सुरेश मनोहर यादव (वय २५, तिन्ही रा. सुदामनगरी, पांढराबोडी) अस आरोपीची नावे आहेत.

सागर हा ड्रायव्हरचे काम करीत होता. याशिवाय वीर हा मजुरी, अजित पेंटींग आणि सुरेश हातमजुरीचे काम करीत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास सर्वच मित्र बंटी उईके नावाच्या मित्राच्या घरात दारू पिण्यासाठी बसले. काही वेळात सागरला दारू चढल्यावर वीर थापा याच्या मामे बहिणीविषयी अपशब्द बोलू लागला.

त्यामुळे वीरला राग आला. त्याने त्याचेशी भांडण करण्यास सुरुवात केली. मात्र, सागरने त्याला धक्का दिल्याने त्याने पलंगाखाली असलेल्या गट्टूने त्याच्या डोक्यावर वार केला. दरम्यान वीरचे मित्र अजित आणि सुरेशनेही त्याच्या डोक्यावर वार करीत, त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि पसार झाले.

काही वेळात अंबाझरी पोलिसांना याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविला. गुन्हा दाखल करीत, काही वेळातच परिसरातून आरोपींना अटक केली.

मृतक-आरोपी तिघेही गुंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर नागले, वीर थापा आणि अजित नेताम हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यांच्यावर अंबाझरी पोलिस ठाण्यासह इतर ठिकाणी गुन्हे दाखल होते. दररोज दारू पिण्याचे त्यांना व्यसन होते. त्यातून ते नेहमीच दारू पिऊन वाद घालायचे.

थापाने घेतला बदला

वीर थापा याचे संपूर्ण कुटुंब एकाच ठिकाणी राहायचे. सागर याचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान त्याची वीरच्या बहिणीवर नजर होती. पंधरा दिवसांपूर्वी त्याने अशाच प्रकारे थापाच्या मामे बहिणीबाबत काहीतरी बोलल्याने त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर सागरने थापाला मारहाण केली होती. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा तयारीत थापा असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे खुनानंतर तिघेही आरोपींनी आपले कपडे बदलवून काहीही झाले नसल्याचे दाखवित परिसरात फिरत असल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT