Fruits and Vegetables 
नागपूर

फळे, भाज्या अधिक काळ टिकणार

व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान : ‘इडिबल कोटिंग’ची निर्मिती

मंगेश गोमासे

नागपूर : शेतकऱ्यांद्वारे पिकविण्यात आलेला शेतमाल हा बाजारात येईपर्यंत ३० ते ४० टक्के खराब होतो. याचा फटका, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना बसतो. मात्र, आता विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या प्रा. डॉ. अनुपमाकुमार यांच्या मार्गदर्शनात दीक्षा लिंगायत आणि रंजिता दास या दोन विद्यार्थिनींनी बायोइंजिनिअरींगच्या माध्यमातून असे ‘इडिबल कोटिंग तयार केले आहे की ज्यामुळे फळ आणि भाज्या जास्त दिवस टिकणार आहेत.

फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि बायोएक्टिव्ह घटक मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात त्याचे नियमित सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फळ आणि भाज्यांचे उत्पादन करणारा देश आहे. मात्र, कृषी संघटनांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी एक तृतीयांश उत्पादन (१.३ बीएमटी) वाया जाते. याचे मुख्य कारण म्हणजे लवकर खराब होणारी फळे आणि भाजीपाला बाजारपेठेत पोहचण्यास होणारा उशीर आणि हा कृषीमाल साठविण्यासाठी शीतगृहे उपलब्ध नसणे हे होय. तसेच रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीमुळेही शेतमालाचे नुकसान होते. तसेच शेतापासून किचनपर्यंतच्या प्रवासात हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक यातून फळे खराब होतात.

याशिवाय त्याचे पौष्टिक मूल्यही कमी होते. त्यामुळे फळ आणि भाज्यांचे कापणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी बहुतांश फळ उत्पादक फळांच्या पृष्ठभागावर मेणाच्या कोटिंगचा वापर करताना दिसून येतात. या कोटींगमुळे फळ चमकदार दिसतात. मात्र, त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मेण हे घातक असतात. त्यात ‘मॉर्फोलिन’ नावाचे एक ‘कार्सिनोजेनिक कंपाउंड असते. त्यामुळे व्हीएनआयटीच्या प्राध्यापिका डॉ. अनुपमा कुमार यांच्या मार्गदर्शनात दीक्षा आणि रंजिता यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रकल्पाच्या ‘ग्रीन प्रिझर्वेटिव्हज’ प्रकल्पाच्या माध्यमातून खाद्यतेल, बायोडिग्रेडेबल, नूतनीकरणीय बायोपॉलिमरपासून ‘इडिबल कोटिंग तयार केली आहे. हे पर्यावरण पूरक असून ते शरीरात गेल्यावरही त्याचा कुठलाही धोका मनुष्याला होत नाही. याशिवाय फळ आणि भाज्या या अधिक काळ ताज्या आणि टिकाऊ होतात.

इडिबल कोटिंग पर्यावरणपुरक

डॉ. अनुपमा कुमार यांनी तयार केलेले ‘इडिबल कोटिंग’मुळे पर्यावरणास कुठलाही अपाय नसून प्लॅस्टिक आणि मेणाच्या कोटिंगला उत्तम पर्याय म्हणूनही त्यास स्वीकारता येणे शक्य आहे. त्यातून अन्न प्रक्रिया उद्योगांमधून काढलेल्या बायोएक्टिव्ह संयुगेसह खाद्यतेल कोटिंग तयार करण्यासाठी नैसर्गिक फूड ग्रेड पॉलिमरचा वापर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT