Fuel price hike erupts again in Nagpur petrol and desal rate news
Fuel price hike erupts again in Nagpur petrol and desal rate news 
नागपूर

बाप्पा... बाप्पा..! नागपुरात पेट्रोल ९१.५६ रुपये प्रति लिटर; इंधन दरवाढीचा पुन्हा भडका

राजेश चरपे

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढीचा आलेख सतत वाढत आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव २४ पैशांनी आणि डिझेलचे दर २० पैशांनी वाढवल्याने नागपुरात पेट्रोल ९१.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८१.८७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. यामुळे आता सर्वसामान्य माणसांचा खिसा हलका होऊ लागला आहे. येत्या काळात महागाई वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सहा दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. कोरोना काळात जून महिन्यापर्यंत सलग तीन महिने इंधनाच्या दरात वाढ केली नव्हती. जून महिन्यापासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर पसरला होता. दरम्यान, बिहारच्या निवडणुका आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर अंकुश आणला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव तळात गेले होते. तरीही भावात घट केली नव्हती. तरीही भाववाढ सुरू असल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले आहे.

शहरात दोन वर्षांपूर्वीही पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्यावेळीही डिझेलने ८० तर पेट्रोलने ९० रुपयावर दर गेले होते. आता पुन्हा एकदा नागपुरात पेट्रोलचे दर ९१.५६ रुपये झाले आहे. तर डिझेलचे दर ८१.८७ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पश्चिम बंगालसह इतरही राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजू लागले असले तरी अद्यापही तारीख निश्चित झालेली नाही. या वर्षाच्या मध्यंतरात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या निवडणुकीत राजकीय लाभ मिळविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दरावर अंकुश आणण्याचे संकेत आहेत.

कॉंग्रेसचे सरकार असताना इंधनाच्या दरात किंचितशी वाढ झाल्यानंतर रस्त्यावर येणारे भाजपचे नेते मात्र, या दरवाढी विरुद्ध चुप्पी साधून असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला
मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. काँग्रेसच्या काळात उठसूट आंदोलन करणाऱ्या हेमा मालिनी, स्मृती इराणी आता कुठे आहेत? दरवाढीची नैतिक जबाबदारी आता भाजप घेणार का? भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.
- प्रवीण कुंटे पाटील,
प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT