कन्हान : रामनगर लोहिया ले-आउट येथे कार्यवाही करताना प्रशासन. 
नागपूर

नातेवाइकाच्या अंत्यविधीस गेला आग्य्राला, अन्‌ परतला तेव्हा घडले हे...

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी/कन्हान (जि.नागपूर ):  रामनगर लोहिया ले-आउट येथील 60 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण हा 17 मार्चला दिल्ली प्रवासातून आला होता. प्रशासनाकडे 31 मार्च रोजी दिल्ली येथील आलेल्या यादीत या व्यक्‍तीचे नाव आढळल्यानंतर प्रशासनाने शोध घेणे सुरू केले. सुरक्षेसाठी 1 एप्रिल रोजी रुग्णाला नागपूरच्या रविभवन येथे त्याला क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्याचा 16 एप्रिल रोजी कोरोना तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह; आढळल्याने प्रशासनाने तत्काळ रहिवासी असलेला परिसर ताबडतोब "सील' केला, तेव्हा परिसरात खळबळ उडाली.

रामनगर लोहिया ले-आउट येथील 60 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळताच तालुका प्रशासनातर्फे परिसराला प्रतिबंधित परिसर म्हणून "सील' केले. रुग्णांच्या नातेवाइकांना तत्काळ क्वॉरंटाइन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली.

रुग्ण महिनाभरापूर्वी आग्राला गेला होता
आग्रावरून मुलीच्या सासऱ्याचा अंत्यसंस्कार करून 17 मार्चला कन्हान येथील लोहिया ले-आउट कन्हान रहिवासी घरी आल्याने प्रशासनाने त्याचा शोध घेउन त्याची तपासणी केली. रविभवन येथे त्याचे क्वॉरंटाइन केले. पहिल्या तपासणीचा अहवाल "निगेटिव्ह' आला. आज 16 दिवसांनी दुसरी तपासणी झाली. त्यात मात्र तो "पॉझिटिव्ह' निघाला. त्यानंतर पत्नी व मुलाला नागपूरला तपासणीकरिता नेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीवरून दिल्लीवरून दोन व आग्रावरून एक असे तिघे जण कन्हान येथे असल्याने तिघांना स्थानिक प्रशासनाने 1 एप्रिल रोजी नागपूरला नेऊन क्‍वॉरंटाईन करून त्यांची तपासणी केली होती.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे !
"पॉझिटिव्ह' आढळलेला रुग्ण हा रविभवन येथे क्वॉरंटाइन होता. तो सदया राहत असलेल्या प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना "हेल्पलाइन' नंबर दिला जाईल. जीवनावश्‍यक वस्तू त्यांना घरपोच पुरविल्या जातील. परिसरातील कुठलाही नागरिक घराबाहेर निघणार नाही आणि कोणाही बाहेरील व्यक्तीला परिसरात प्रवेश नसणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
वरुणकुमार सहारे
तहसीलदार, पारशिवनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT