नागपूर

Gadchiroli Honeytrap Case: हनीट्रॅपमध्ये अडकवून अभियंत्याला मागितली दहा लाखांची खंडणी, पत्रकार आणि पोलिस शिपाई ताब्यात

गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला 'कॉलगर्ल'च्या माध्यमातून 'हनीट्रॅप' मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलिस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gadchiroli Assistant Engineer Honey Trap: गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला 'कॉलगर्ल'च्या माध्यमातून 'हनीट्रॅप' मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलिस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई रोहित अहीर अशी त्यांची नावे आहेत.

४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी 'कॉलगर्ल' सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता असल्याचे कळले. तिने ही बाब नागपुरातील एका डिजिटल माध्यमामध्ये कार्यरत पत्रकार रविकांत कांबळे याला सांगितली.

रविकांत आणि 'ती'ची जुनी ओळख होती. 'त्या' अभियंत्यांची आणि पोलिस शिपाई सुशील गवईची ओळख असल्याचे रविकांतला माहिती होते. त्यामुळे त्याने 'कॉलगर्ल' आणि इतर आरोपींना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत गवईकडे १० लाखांची मागणी केली. (Latest Marathi News)

गवईने देखील संधी साधून पीडित अभियंत्याला प्रकरण दडपण्यासाठी १० लाख मागितले. मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवार (ता. २८) नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक महिला फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT