नागपूर

गडकरींचा खासदार महोत्सव रद्द; महापौरांच्या काव्यसंमेलनात गर्दी

पक्षातील मोठ्या नेत्यांचा आदर्शही महापौरांनी घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने (state governement)काल, शुक्रवारी निर्बंध जाहीर करताच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांच्या संकल्पनेतील सांस्कृतिक खासदार महोत्सव रद्द करण्यात आल्याचे तत्काळ जाहीर करण्यात आले. परंतु महापौर दयाशंकर तिवारी(mayor dayashankar tiwari) यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कवी संमेलनात श्रोत्यांची गर्दी दिसून आली. त्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांचा आदर्शही महापौरांनी घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात वाढत्या ओमिक्रॉन रुग्णांमुळे तसेच नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने काल, शुक्रवारी नवीन नियमावली जाहीर करीत निर्बंध घातले. महापालिका आयुक्तांनी आजपासूनच निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश काढले. निर्बंधामध्ये सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी केवळ ९ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आदेश काढताच, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव रद्द केल्याची माहिती काल, शुक्रवारीच आयोजन समितीने दिली.

शनिवार, रविवारचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले. महापौर दयाशंकर तिवारी यांनीही गांधीबाग उद्यानात आज काव्य संमेलनाचे आयोजन केले. महापालिका आयुक्तांनी आजपासून निर्बंध जाहीर केल्यानंतर महापौरांनी काव्य संमेलनाची वेळ रात्री बारापासून नऊपर्यंत कमी केली. याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबूकवर पोस्टही शेअर केली. गांधीबाग उद्यानात आज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत कवी संमेलन पार पडले. परंतु केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे खासदार महोत्सव रद्द करतात, तर महापौर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काव्य संमेलन रद्द करू शकत नव्हते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काव्य संमेलन पूर्वनियोजित होते तर खासदार महोत्सवही पूर्वनियोजित होता. केंद्रीयमंत्री गडकरी महापौरांचेही नेते आहे. परंतु नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी नेत्याकडूनही प्रेरणा घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT