ganesh chaturthi 2023 nagpur corporation initiative Clay Ganesha Idol Sales Places One Click Stopping Sale of POP Idols Sakal
नागपूर

Ganesh Chaturthi 2023 : मातीच्या गणेश मूर्ती विक्रीची ठिकाणे एका क्लिकवर

मनपा व पारंपरिक मूर्तिकारांचा प्रयत्न ः पीओपी मूर्ती विक्री रोखण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेने पर्यावरणपूरकर गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला असून मातीच्या गणेश मूर्ती विक्रीची ठिकाणे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एका क्लिकवर ही सर्व ठिकाणे नागरिकांना कळणार आहेत.

याबाबत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व पारंपरिक मूर्तीकार संघाने एकत्र प्रयत्न सुरू केले आहे. सध्या महापालिका मातीच्या मूर्तीकारांसाठी शहराच्या चार बाजूने जागा निश्चित करीत आहे. महापालिकेने पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्यांवर दहा हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना शोधणार कसे, असा प्रश्न कायम आहे.

महापालिकेने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सावाच्या अनुषंगाने दहाही झोनमध्ये मूर्ती स्वीकार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शहरात मातीच्या मूर्तीची विक्री करणाऱ्या दुकानदारांना ठराविक जागा देण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांना मातीच्या मूर्तीच्या शोधासाठी कुठेही भटकावे लागणार नाही. शहराच्या चार दिशांमध्ये ही दुकाने निश्चित करण्यात येणार आहे. महापालिकेने पारंपरिक मूर्तीकार संघटनेकडून शहरातील मातीच्या मूर्तीकारांची नावे मागितली असून त्यांची दुकाने कुठे राहतील, याबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांना एका क्लिकवर मातीच्या गणेश मूर्तीची ठिकाणे दिसून येणार आहे. सध्या महापालिकेने रामनगर येथील नासुप्रच्या जागेवर मातीच्या मूर्ती विक्रीसाठी जागा निश्चित केली. इतर ठिकाणेही लवकरच निश्चित केली जाणार आहे.

या जागांबाबत नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी महापालिका जनजागृतीही करणार आहे. त्याचवेळी शहरात पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्यांवर महापालिकेने दहा हजारांच्या दंडाची घोषणा केली.

परंतु पीओपी मूर्ती शहरात कुठे येणार, कुठे विक्री केली जाईल, या विक्रीवर कसे नियंत्रण आणणार, असे अनेक प्रश्न आहेत. पीओपी मूर्ती विक्रेत्यांना रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे राहणार आहे.

महापालिका उपलब्ध करून देणार स्टॉल

पारंपरिक मूर्तिकार संघाच्या मागणीनुसार अनामत रक्कम ५००० रुपये पूर्णतः माफ न करता ५०० रुपये करण्यात येणार आहे. मूर्तिकार संघटनेच्या मागणीनुसार संघटनेला मातीच्या मूर्ती विक्री केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूर्तिकार बांधवांना विक्रीसाठी १० बाय १० फूट आकाराच्या पेंडॉलची निर्मिती करून दिली जाईल. त्यासाठी प्रति पेंडॉल प्रति दिवस एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.

पीओपी मूर्ती विक्रेत्यांना पकडण्यासाठी पारंपरिक मूर्तीकारांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेतले जाईल. नागरिकांना पीओपी मूर्ती विक्रेते आढळून आल्यास झोन कार्यालयाला माहिती द्यावी.

- डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT