नागपूर

यंदा पीओपीच्या बाप्पांसमोर विघ्न; खरेदी-विक्री ठरणार गुन्हा

राजेश चरपे

नागपूर : सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्याची खरेदी आणि विक्री कायद्याने गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे पीओपीची मूर्ती आढळल्यास नागरिकांना तक्रारीसाठी टोल फ्री कमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.

पीओपीच्या मूर्ती संदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश भगत, विजय देशमुख, पशुचिकित्सक अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त विजय हुमने, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील उपस्थित होते.

पीओपी मूर्तीसंदर्भातील बंदीचे आदेश असल्याने त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे झोनच्या सहायक आयुक्तांची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक मूर्तीकारांसाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. या मूर्तीकारांना मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीसुद्धा तातडीने सुरू करण्यात यावी.

पीओपी मूर्तीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे झोनस्तरावर जनजागृतीचा कार्यक्रम आखण्यात यावा. पीओपी मूर्ती खरेदी आणि विक्री कायद्याने आता गुन्हा ठरतो. खरेदी अथवा विक्री केल्यास दहा हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त, दोन वर्षे बंदी याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्या. कचरा गाड्या, चौकातील ध्वनिक्षेपक आदी ठिकाणांहून यासंदर्भात माहिती देणाऱ्या ऑडियो क्लिप प्रसारित करा, अशी सूचनाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT