ganesh murti 
नागपूर

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे! त्यांच्या किमयागार हातातून साकारते गणेश मूर्ती

मनीषा मोहोड येरखेडे

नागपूर : बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. कुणी स्वतः आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती घडवतात, तर कुणी त्याच्यासाठी सजावट करतात. काहीजण स्वतःच मूर्ती तयार करतात. या स्वनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो. नागपूरातील श्वेता बक्षी यांनीही आधी आवड म्‍हणून गणेश मूर्ती साकारणे सुरू केले होते; आता त्याला व्यावसायिक रूप आले आहे.

घर आणि मुलांना सांभाळतांनाच केवळ आवड म्हणून गणेश मूर्ती साकारण्याचे काम नागपूर येथील गृहीणी श्वेता बक्षी यांनी सुरू केले. त्यानंतर दरवर्षी घरी आपणच तयार केलेल्या मूर्तीची स्थापन करण्याचा शिरस्ता श्वेता यांनी सुरू केला.

नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या सुंदर आणि आकर्षक मुर्ती पाहून परिसरातील अनेकांनी आमच्यासाठीही मूर्ती तयार करून द्या अशी मागणी केली असता,श्वेता यांनी घरीच छोटेखानी कलारूम स्‍थापित करून मूर्ती निर्मितीचे काम सुरू केले.

सुरुवातीला तीन.. चार.. असे करता करता.. आता तब्बल पन्नास ते साठ मुर्तींची मागणी श्वेता यांच्याकडे येऊ लागली आहे. शाडुमातीपासून तयार केलेल्या एक फूटापर्यंतच्या मूर्तीना यंदा अधिकच मागणी आहे. श्वेता या मुर्ती साठी लागणारे सोवळे आणि दागिनेही स्वतः हाताने तयार करतात. त्यामुळेच बाप्पाची मुर्ती अधिकच उठावदार दिसते. याशिवाय श्वेता बक्षी या कोकणस्थ महालक्ष्मींचे मुखवटे तयार करून देण्याचे कामही करतात. त्यांच्या या कलाकृतीचे कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनाच कौतुक असल्याचे त्यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.

यंदा मागणी दुप्पट
घरगुती गणेशोत्सवासाठी घरात मूर्ती बनवायची आणि विसर्जनही घरातच करायचे, अशी निसर्गस्नेही संकल्पना शेकडो कुटुंबांनी स्विकारली आहे. यंदा कोरोनाच्या भितीमुळे घरगुती मूर्तींची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनमुळे घरातील सर्वच सदस्य घरीच असल्याने, मुर्ती तयार करण्याच्या ऑनलाईन कार्यशाळांना हजेरी लावीत मुलांनीही गणरायाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच सोवळ्याचे सुबक कपडे आणि हाताने बनविलेल्या आकर्षक दागिन्यांनी सजविलेल्या श्वेता बक्षी यांच्या गणेश मुर्तींना यंदा दुप्पट मागणी आहे.


प्रतिष्ठापनेचा आनंद वेगळाच
शाडू किंवा साच्यातून घरी बनविलेल्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंद वेगळाच. उत्सवानंतर याच मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन केले तर हीच माती पुढील वर्षीही उपयोगी ठरू शकते. त्यामुळे गणेशोत्सवातील प्रदूषण निश्चितपणे हद्दपार होऊ शकते.
श्वेता बक्षी, नागपूर.


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT