Modak sakal
नागपूर

Ganeshotsav Modak : बाप्पाच्या मोदकाला महागाईची झळ; मोदक १२०० रुपये किलो

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईची झळ बाप्पाच्या प्रसादलाही बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईची झळ बाप्पाच्या प्रसादलाही बसला आहे. त्यामुळे प्रसाद खरेदी करण्यासाठी थोडा अधिक पैसा खर्च करावा लागत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिठाईच्या किमतीत आठ ते दहा टक्के वाढ केलेली आहे. काजू मोदक, कोकोनट ऑरेंज मोदक, केसरी मोदक बाजारात आले आहे. चांदीचा अर्क असलेल्या काजू मोदकाची किंमत ११५० ते १२०० रुपये किलो आहे.

गणरायाला फळे, मिठाई, घरी केलेला नैवेद्य आरती झाल्यानंतर ठेवला जातो. याशिवाय खास गणेशोत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मिठाई देऊन केला जातो. पेढे, मोतीचूर व बुंदीचे लाडू, खवा मोदक, काजू कतली अशा वेगवेगळ्या मिठाई प्रसाद म्हणून दिला जातो.

सार्वजनिक मंडळांमध्ये दररोजच्या आरतीनंतर उपस्थित भाविकांना दिला जाणार अधिकतम प्रसाद हा मिठाईच्या दुकानातून आणण्यात येतो. यंदा कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईच्या दरातही वाढ झाली आहे.

दर १० टक्क्यांनी वाढले

पावसाने ओढ दिल्याने तुरीचे पीक कमी आले आहे. त्यामुळे तूरडाळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तूरडाळ प्रति किलो १७० रुपयांनी वाढली आहे. घाऊक बाजारात साखरेचे भाव वाढलेले आहे. हरभरा डाळीच्या दरातही वाढ झाल्याने बेसनाचे दर वाढलेले आहे.

याशिवाय दुधाची आवक कमी झाल्याने खव्याचे भाव वाढले आहे. वनस्पती तुपाचे दरही दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम मिठाई उत्पादनावरही झाला असून, त्याचे दरही १० टक्क्यांनी वाढले आहेत असे एका विक्रेत्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT