नागपूर

नागपूर : गंगाजमुनात ६० दिवसांसाठी ही अधिसूचना, वाचा सविस्तर...

अनिल कांबळे

नागपूर : लकडगंज हद्दीतील गंगाजमुना वस्तीतील परिसरात असलेले प्रार्थना स्थळे, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, रुग्णालय यापासून २०० मीटरच्या आत देहव्यवसाय करण्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमान्वये पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिसूचना जारी करून तेथील काही भाग आता सार्वजनिक केला आहे. सार्वजनिक असलेल्या या स्थळापासून आता २०० मीटरच्या आत देहव्यवसाय करता येणार नाही.

शहरातील काही स्थळांपासून काही अंतरावर देहव्यापार करण्यास मनाई करण्यात आली आहे. बालाजी मंदिर लकडगंज, चिंतेश्वर मंदिर जुनी मंगळवारी, बाबा कमलीशाह दर्गा मुख्य गल्ली गंगाजमुना, दुर्गा देवी मंदिर गंगाजमुना, राधा स्वामी सत्संग भवन लकडगंज, शारदा देवी मंदिर गंगाजमुना, चिंतेश्वर हिंदी प्राथमिक शाळा जुनी मंगळवारी, हिंदुस्थान हायस्कूल लकडगंज आदी स्थळांचा यात समावेश आहे.

सोबतच गंगाजमुनातील पोलिस चौकी, येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आदी जागासुद्धा सार्वजनिक घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सार्वजनिक जागेपासून २०० मीटरच्या परिसरात वेश्याव्यवसाय करता येणार नाही. बुधवार, २५ ऑगस्टपासून पुढील ६० दिवसांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

३० दिवसांच्या आत अभिप्राय कळवा

सामान्य नागरिकांना या संबंधी काही हरकती किंवा आक्षेप असल्यास अधिसूचना जारी झाल्याच्या ३० दिवसांच्या आत अभिप्राय पोलिस आयुक्त कार्यालय पटेल बंगला, मंगळवारी झोन कार्यालयाजवळ सदर येथे लेखी किंवा ई-मेलच्या माध्यमातून कळवावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांच्या वतीने करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT