Gramin police.
Gramin police. 
नागपूर

नागपुरात पेटणार गॅंगवार? गॅंगस्टरवर गोळीबार करणाऱ्या टोळीला अटक

अनिल कांबळे

नागपूर : गणेश मेश्राम हा उपराजधानीतील मोठा गॅंगस्टर असून त्याच्यावर आतापर्यंत डझनभर गुन्हे दाखल आहेत. डॉन संतोष आंबेकर आणि गॅंगस्टर राजू बद्रे हे दोघेही सध्या कारागृहात असल्यामुळे गुन्हेगारी जगतात वर्चस्वावरून अनेक टोळ्या आपापासात संघर्ष करीत आहेत.

त्यामध्ये गणेश मेश्राम याच्या टोळीचा प्रतापनगरात दबदबा आहे. त्याने गोलू मलिये यांच्या गॅंगमधील अनेकांना स्वतःच्या गॅंगमध्ये सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईवरून गोलू आणि गणेश यांच्यात गॅंगवार सुरू झाले. गेल्या 15 दिवसांपूर्वी गोलूने गणेशवर हल्ला करीत त्याच्या कारची तोडफोड केली होती. मात्र, गणेशने पळ काढल्यामुळे तो थोडक्‍यात बचावला होता. या प्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाण्यात गोलूविरूद्ध गुन्हा दाखल आहे.

गणेशने काढला पळ
गणेशचा गेम होणार हे गुन्हेगारी जगतात सर्वांना माहित होते. त्यामुळे गणेशने काही दिवस गोलूच्या भीतीपोटी कळमेश्‍वरात किरायाने रूम घेऊन बस्तान मांडले. पत्नी प्रियंका आणि मुलासह तो राहत होता. शहरात राहिल्यास कोणत्याही क्षणी आपला गेम होईल, अशी भीती गणेशला होता. त्यामुळे तो शहर सोडून पळाला होता.

हेर लावून काढला पत्ता
शहरातून गणेश अचानक बेपत्ता झाल्यामुळे गोलू मलिये चकीत झाला. त्याने गॅंगचा सदस्य फारूख जबीउल्ला खान याला गणेशचा पत्ता हुडकून काढण्यास सांगितले. फारूखने चार साथिदारांच्या मदतीने गणेशचा शहरासह अन्य ठिकाणी शोध घेतला. शेवटी तो कळमेश्‍वरात लपून बसल्याचे कळले. त्याने लगेच गोलूला टीप दिली.

नागपुरातील गॅंगस्टर गणेश मेश्राम आणि पत्नी प्रियंका मेश्राम यांच्यावर कळमेश्‍वरात प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्‍या गोलू मलिये याच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार करून "गेम' करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी आहेत. फायरिंग करणाऱ्या गोलूच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. गणेशवर हल्ला केल्यामुळे आता नागपूर शहरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

"गेम' करण्याचा कट
गोलू मलिये, फारूख खान, शोवीन माकोडे (कळमेश्‍वर), हिमांशू रविशंकर चंद्राकर (24, त्रिमूर्तीनगर), मोहम्मद हैदर परवेज अन्सारी (20, बंगाली पंजा), अंकित रामचंद्र धुर्वे (20, एकात्मता नगर), चंद्रकांत सुरेश शिंदे (दाते लेआउट), अभिषेक मंगेश गिरी (पाचपावली), अंकित तुळशीराम निमजे (24, पाचपाली), गौरव अजय पिल्ले (रेल्वे कॉलनी) हे सोमवारी अकरा वाजता कळमेश्‍वरात पोहचले. सर्वांकडे पिस्तूल, तलवार, गुप्तीसह अन्य शस्त्र होते. गणेशच्या घरात घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार के ला. गोळीबारात गणेश आणि प्रियंका दोघेही गंभीर जखमी झाले.

सापळा रचून आरोपींना अटक
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे अनिल जिट्‌टावार यांच्या पथकाकडे आरोपींना पकडण्याची जबाबदारी सोपवली. पीएसआय सचिन मत्ते जीतेंद्र वैरागडे, नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, रमेश भोयर, ज्ञानेश्‍वर राऊत, महेश जाधव, संतोष पंढरे, मदन आसतकर, दिनेश अधापुरे या पथकाने नागपुरातून तपास सुरू केला. तासाभरात गोलूचा साथीदार हिमांशू चंद्रकारला ताब्यात घेतले. त्याला खाक्‍या दाखवताच या गोळीबार प्रकरणाचा छडा लागला. पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली.
 

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT