Gastro Outbreak in Nagpur's Dongargaona  sakal
नागपूर

Gastro Outbreak: डोंगरगाव येथे गॅस्ट्रोची लागण; एका व्यक्तीचा मृत्यू

One person dies due to gastro infection in Dongargaon: डोंगरगावमध्ये गॅस्ट्रोची लागण पसरली असून, एकाचा मृत्यू झाला आहे; आरोग्य विभागाकडून इशारा जारी.

सकाळ वृत्तसेवा

Waterborne disease causes fatality in Dongargaon: दूषित पाणी पिल्याने नागभीड नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथील अनेक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामध्ये रवी मनोहर दिनांक (४०) या इसमाचा मृत्यू झालेला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने हातपंपावर पिण्यासाठी पाणी वापरू नये असा फलक लावलेला असून डोंगरगाव येथील शिव मंदिरात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मृतक रवी मनोहर दिनांक यांचा गॅस्ट्रोची लागण झाल्या नंतर ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे उपचारदरम्याम मृत्यू झाला.संध्या रेहेले (४०) यशलोक हॉस्पिटल, आसाराम धर्मा (५५) ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रम्हपुरी, सोमेश्वर जांभुळे (६०) जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे अतिदक्षता विभागात भरती असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

प्रिया जांभुळे (२२) जिल्हा रुग्णालय गडचिरोली, गुरुदेव शिवणकर (३९), चिंदु मेश्राम (७०), ट्विंकल पाथोडे (१२), संगीता रामटेके (५२), चिराग पाथोडे (१४), सुभाष पाथोडे (४२), रूपा हेमणे (३५), रुखमा बोरकर (६६) हे नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नागभीड येथे उपचार घेत असून काहींना उपचारार्थ सुटी देण्यात आली आहे. सध्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष कॅम्पच्या माध्यमातून उपचार सुरु असून पाणी उकळून पिण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

डोंगरगाव येथे गॅस्ट्रोची लागण झालेल्या सर्व रुग्णावर योग्य ते उपचार सुरु असून गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने विशेष कॅम्पचे आयोजन गावात करण्यात आलेले असून आरोग्य विभाग अलर्ट मोड वर आहे.

- डॉ. विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, नागभीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT