नागपूर

सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार ९८० घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०१९ रोजी एकूण ४ हजार ३४५ घरकुलांपैकी ४ हजार १७२ घरकुलांची सोडत काढली होती. एकूण ४ हजार ३४५ घरकुलांपैकी २ हजार ९८० घरकुलांची सोडत आज करण्यात आली.

नागपूरसारख्या महानगरामध्ये घरांचे स्वप्न साकार करणे हे सोपे नाही. वाढलेल्या जमिनीच्या किमती, घरांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना शहरात घर बांधणे व स्वतःच्या घरात राहण्याची संधी फार कष्टाने मिळते. प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना घरकुले मिळाली आहेत. या योजनेंतर्गत शहरात वाठोडा तरोडी (खुर्द) व वांजरी या भागात घरकुल बांधण्याचे प्रकल्प सुरू करून जवळपास ४ हजार ३४५ घरकुल बांधून तयार झालेली आहेत. म्हणजे एवढ्या लोकांना हक्काचे घर लवकरच मिळणार आहेत. लोकांनी घरकुलांची सारी रक्कम भरल्याने घरकुलाचा ताबाही मिळाला आहे. उरलेल्या जवळपास तीन हजार घरकुलांची सोडत झालेली आहे. शहराच्या विकासासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे नितीन राऊत म्हणाले.

अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपाचा दुसरा टप्पा लवकरच विकसित करण्यात येणार आहे. एन.एम.आर.डी.ए.च्या योजनांना पालकमंत्री या नात्याने सहकार्य करील. सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्याची पुंजी घर बांधण्यासाठी लावतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत घरांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे राहील, याकडे एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT