give 1 lakh to release husband from police station crime nagpur police Sakal
नागपूर

Nagpur Crime News : ‘पतीला पोलिस ठाण्यातून सोडविण्यासाठी १ लाख दे’

गुंडाच्या पत्नीने मागितली खंडणी; देह व्यापाराच्या दुष्टचक्रात अडकला व्यापारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देह व्यावसायात अडकलेल्या व्यापाऱ्याला पोलिस कारवाईपासून वाचविण्यासाठी गुंडाच्या पत्नीने चक्क १ लाखाची खंडणी मागितली. पैसे घेतल्यावरही व्यापाऱ्याची सुटका न झाल्याने अखेर त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेवर खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. रेणुका अमित तिवारी (३०) रा. टेंपल बाजार रोड, सीताबर्डी असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

मागील दहा दिवसापूर्वी ३ मे रोजी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कॉटन मार्केटच्या महात्मा फुले बाजारात धाड टाकली होती. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करण्याच्या नावावर देहविक्रयाचा अड्डा चालवणाऱ्या जय महादेव जोशी (४२) याला अटक केली होती.

पोलिसांनी जयची कोठडी घेतली होती आणि तो ४ ते ७ मे पर्यंत गणेशपेठ ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद होता. ५ मेच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास रेणुकाने जयच्या मुलीच्या मोबाईलवर कॉल केला. जयची पत्नी नेहा हिला, पतीला सोडवायचे असेल तर मानेवाडा चौकात भेटण्यास बोलावले. नेहा मुलीसह तिला भेटायला गेली.

रेणुकाने नेहाला सांगितले की, ती जयचा मित्र राजेश जाधव याची बहीण आहे आणि एनजीओ चालवते. तिची पोलिस विभागात चांगली ओळख आहे. सायंकाळी ६ वाजतापर्यंत तिचे पती लॉकअपमधून बाहेर येतील, मात्र त्यासाठी १ लाख १० हजार रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीतर या प्रकरणात तुलाही अटक होईल, अशी भीती दाखवली. नेहाकडे पैसे नव्हते. त्यामुळे नेहाने तिचे दागिने सराफाकडे गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली.

फोन टेप होत असल्याची दाखविली भीती

रेणुकाने नेहाला मॉडेल मिल चौकाजवळ उभे राहण्यास सांगितले आणि स्वत: पोलिस स्टेशनमध्ये गेली. जवळपास १५ मिनिटानंतर परतली आणि ६ वाजतापर्यंत पोलिस तिच्या पतीला सोडतील अशी थाप मारली. तसेच फोन टेप होत असल्याने कोणालाही फोन न करण्यास सांगून निघून गेली. सायंकाळी उशिरापर्यंतही पती घरी न परतल्यामुळे नेहाने रेणुकाला फोन केला.

मात्र फोन बंद होता. विचारपूस केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत नेहाला रेणुकाचे नाव ही माहिती नव्हते. तिने गणेशपेठ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मोबाईल नंबरच्या माध्यमातून रेणुकाचा शोध लावला व अटक केली. रेणुकाचा पती अमित ऊर्फ अम्मू हा गुंड असून त्याच्यावर खुनासह इतरही गंभीर गुन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT