ashish deshmukh  
नागपूर

"परप्रातींयामुळे जिल्ह्यातील रुग्णांना फटका; राज्यातील रुग्णांना प्राधान्य द्या"

डॉ. आशिष देशमुख यांची मागणी

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढसारख्या परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने याचा फटका जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना बसत असून शासकीय रुग्णालयांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

उपराजधानी नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा महाउद्रेक सुरू आहे. दिवसाआड कोरोनाबाधितांचा रेकॉर्डब्रेक होत आहे. त्यामुळे खाटांची संख्या कमी पडत आहे. मेडिकल, मेयो, लता मंगेशकर हॉस्पिटलसारख्या मोठ्या तसेच इतर खासगी रुग्णालयात खाटाच शिल्लक नाहीत. दर तासाला जवळपास ३०० लोक बाधित होत आहेत. मृत्यूचा आकडा वाढतच आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. कोरोना प्रकोपामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करूनही खाटा मिळत नाहीत. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे दुसरीकडे तात्पुरते रुग्णालय उभारणे शक्य होत नाही. विक्रमी चाचण्यांची नोंद होत असतानाच विक्रमी बाधित समोर येत आहेत. दरम्यान, नागपूरमध्ये औषधांचा, आयसीयू आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. नागपूरमधील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत.

अधिकांश रुग्णालयांमध्ये परप्रांतातील रुग्ण सेवा घेत असल्यामुळे इथल्या रुग्णांना भरती उपचार सेवेपासून मुकावे लागत आहे. त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आप-आपल्या राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा केल्यास तेथील रुग्णांना नागपूरला यायची गरज पडणार नाही. वेळीच उपाय-योजना केल्या गेल्या नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांना प्राधान्य देऊन शासकीय किंवा खासगी रुग्णालयात आधी भरती करावे. रहिवासी दाखला म्हणून आधारकार्डचा वापर करावा, असे मत माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune Research Students Protest: संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा राज्य सरकारवर आरोप, तीव्र असंतोष

Minister Bharat Gogawale:'मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल'; विकासकामांचे लोकार्पण; रॅलीद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

SCROLL FOR NEXT