Edible Oil Price Updates sakal
नागपूर

नागपूर : खाद्यतेलाचे भाव घसरले

पावसाने दडी मारल्याने डाळी, तांदळाची दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जागतिक कमॉडिटी बाजारात तेलबिया आणि खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या दरात तब्बल दुप्पटीने वाढ झालेली आहे. ही घट दिलासा देणारी असली तरी ग्राहकांच्या खिसा हलका करणारीच आहे. खाद्य तेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाची किंमत प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी केले आहे. पावसाने दडी दिल्यामुळे मुग मोगर, उडीद, तूर डाळ, तांदळाच्या दरातही प्रति क्लिंटल १०० ते १५० रुपयांची वाढ झालेली आहे. (Edible Oil Price Updates)

इंडोनेशियाने पामतेल निर्यात करण्याची बंदी मागे घेतल्यानंतर देशात सुमारे दोन लाख टन कच्चे पामतेल भारतात पाठवण्यात आले आहे. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढलेली आहे. त्यामुळे इतर खाद्यतेलांच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. गेल्या पाऊण महिन्यात दिवसात सोयाबीन तेल प्रतिकिलो सात ते आठ रुपयांनी घटले आहे. २० जूनपर्यंत किरकोळ बाजारात पामतेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच तेलाच्या दरात घट झाली आहे. गेल्या पाऊण महिन्यात १५ किलो सोयाबिनचा डब्बा २८०० रुपये होता तो आता २५०० रुपयावर आला आहे. त्याचा लाभ थोड्याफार प्रमाणात ग्राहकांना मिळत आहे, नागपूर किरकोळ बाजार संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी दर कपात केली आहे. या निर्णयाने पामतेलाचा भाव ७ ते ८ रुपयांनी कमी झाला आहे. सूर्यफूल तेलाचा भाव १० ते १५ रुपयांनी आणि सोयाबीन तेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे.

शाळा सुरु झाल्याने किराणा बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. परिणामी, बाजारात शांतता आहे. उन्हाळ्याच्या काळात गहू, डाळीची खरेदीला चांगले दिवस असतात, आता शाळा सुरु झाल्याने पुस्तके, शाळेचा पोषाख आणि शैक्षणिक साहित्य खरेदीवर ग्राहकांचा भर आहे असे किराणा व्यापारी अनिल नागपाल यांनी सांगितले. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध आणल्याने साखरेचे भाव स्थिरावलेले आहेत. तसेच पावसाने दडी दिल्यामुळे किराणा धान्याचे दर वाढू लागले आहे. गव्हाचे भाव स्थिरावलेले आहेत असे डी.बी.मार्टचे आदर्श देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT