गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा  Sakal
नागपूर

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

धावत्या रेल्वेतील सुमारे ९० प्रवाशांना अंडा बिर्याणीतून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार गाडी क्रमांक २२५३४ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये घडला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धावत्या रेल्वेतील सुमारे ९० प्रवाशांना अंडा बिर्याणीतून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार गाडी क्रमांक २२५३४ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये घडला. बल्लारशा आणि नागपूर स्थानकातून अन्नाचा पुरवठा झाल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दोन्ही स्थानकावरील पुरवठारांच्या खाद्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहे.

गाडीमधील बी-१,२,३,५,७ आणि ९ क्रमांकाच्या डब्यातील प्रवाशांना नागपूर स्थानकावरून ही अंडा बिर्याणी दिली होती. यामुळे नागपूर स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर असलेले जन आहार रेस्टॉरेंट सील करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जन आहारमधील एक वेंडर प्रवाशांना अंडा बिर्याणी विकत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. बल्लारशा स्थानकावर १०० अंडा बिर्याणी आणि अंडाकरीची ऑर्डर दिली गेली. नागपूर स्थानकावर ऑर्डर मिळेल, असे सांगण्यात आले. ही गाडी रात्री ९.३० वाजता नागपूरच्या फलाट क्रमांक १ वर पोहोचताच जेवण मिळाले.

काही प्रवाशांनी स्टेशनवरील जन आहारच्या वेंडरकडूनही अंडा बिर्याणी घेतली. अर्ध्या तासानंतर इटारसी येण्यापूर्वीच प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले व उलट्या सुरू झाल्या. काही प्रवाशांनी वैद्यकीय मदतही मागितली. मात्र, झाशीपर्यंत मदत मिळाली नाही. तक्रारी करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने टीटीईने नियंत्रण कक्षाला कळवताच रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. वैद्यकीय पथकाकडून कानपूरमध्ये प्रवाशांवर उपचार करण्यात आले.

मध्य रेल्वे प्रशासनात खळबळ

बल्लारशा आणि नागपुरात मिळालेल्या जेवणातून प्रकृती बिघडल्याची तक्रार मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः स्टेशनवर पोहोचून चौकशी सुरू केली. याच दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून फुटेज तपासले. त्यात जन आहारमधील एक वेंडर जेवण विकताना दिसला. त्यानंतर तातडीने जन आहार रेस्टॉरंट सील करण्यात आल्याची माहिती आहे.

जनआहार रेस्टॉरंटचे टेंडर रद्द करा

या घटनेमुळे जन आहार रेस्टॉरेंटचे टेंडर रद्द करण्यात यावे, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत कुमार शुक्ला यांनी केली आहे. त्यांनी पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक व मध्ये रेल्वेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

नागपूर आणि बल्लारशा स्थानकावरून खाद्य पदार्थांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पुरवठादारांच्या खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दोन-तीन दिवसात अहवाल येईल. काळजी म्हणून आम्ही जन आहार रेस्टॉरेंटचा खाद्य पुरवठा तात्पुरता थांबविला आहे. चौकशी सुरू आहे.

- अमन मित्तल वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक- मध्य रेल्वे, नागपूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT