gorewade
gorewade e sakal
नागपूर

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय सुरू करायला घाई केलीय का?

भाग्यश्री राऊत

नागपूर : काही दिवसांपूर्वी चेन्नईमधील प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनाने (coronavirus) झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देशातील सर्व वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प बंद आहेत. मात्र, आज (मंगळवार)पासून नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय (gorewade international zoo park nagpur) पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. या प्राणी संग्रहालयात प्राण्यांना कोरोनाचा धोका नसला तरी पर्यटकांना मात्र धोका संभवू शकतो. त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय सुरू करतानाही काही दिवस वाट पाहायला हवी, असे वन्यप्रेमी सांगतात. (gorewada zoo starts from today for tourism)

तब्बल तीन महिन्यानंतर गोरेवाड्याचे प्रवेशद्वारातून इंडियन सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. सध्या इंडियन सफारी सुरू करण्यात आली आहे. या सफारीची वेळ मंगळवार ते रविवार सकाळी ८.३०, ९.३०, १०.३०, ११.३० व दुपारी १२.३०, १.३०, २.३०,३.३० आणि ४.३० पर्यंत आहे. फक्त सोमवारी सफारी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. तसेच ही सफारी बंद बसेसमधून सुरू आहे. ऑनलाइन बुकिंग सुविधा www.mahaecotourism.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचे कुठलेही आदेश आले नसल्याचे अधिकारी सांगतात. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयामध्ये माणसांपासून प्राण्यांना कोरोनाचा कुठलाही धोका नाही. कारण प्राणी हे खुले आहेत आणि बंद बसमधून पर्यटकांना सफारी करता येणार आहे. पण, एकाच बसमधून नागरिक जाणार असेल तर त्यांना कोरोनाचा धोका होण्याची भीतीही व्यक्त केली जाते.

याबाबत वन्यप्रेमी कुंदन हाते सांगतात, की विभागीय प्रशासनाने गोरेवाडा प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे प्राण्यांना कुठलाही धोका नाही. पण, नागरिक बसमधून प्रवास करत असेल तर पर्यटकांना कोरोनाचा धोका होऊ शकतो. ३५ क्षमता असलेल्या बसची क्षमता २० वर आणली तरी त्यामुळेही संक्रमण होऊ शकते. त्यामुळे काही दिवस वाट पाहायला हवी होती आणि त्यानंतर प्राणीसंग्रहालय सुरू करायला पाहिजे होते.''

जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय योग्यच आहे. कारण व्याघ्र प्रकल्प असतील किंवा नॅशनल पार्क असतील यामध्ये प्राण्यांना कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. त्यामुळे सर्व काही ठीक झाल्यावरच जंगल सफारी सुरू करणे योग्य असेल, असेही कुंदन हाते सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT