medical 
नागपूर

अग्निशमन यंत्रणेसाठी मेडिकलला मिळाले ९ कोटी; मेयोतील यंत्रणेबाबत गोंधळ कायम

केवल जीवनतारे

नागपूर ः जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालय आणि आता नुकतेच मुंबईतील रुग्णालयांतील आगीमध्ये अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा मेडिकल आणि मेयोतील फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला. मात्र यावेळी अधिष्ठातांच्या पुढाकारातून कोविड वॉर्डासहित मेडिकलमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी ८ कोटी ९४ लाखाचा निधी मंजूर झाला. नव्हेतर जिल्हा विकास नियोजन समितीमार्फत मेडिकलच्या तिजोरीत जमा झाला आहे.

मेडिकलमध्ये पाच वर्षांपुर्वी ट्रॉमा केअर सेंटर उभारले. आशियातील सर्वांत सुसज्ज असे सेंटर म्हणून दावा करण्यात येत होता. मात्र येथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणाच उभारण्यात आली नसल्याचे उघड झाले. याशिवाय मेडिकलच्या मुळ इमारतीमधील जीर्ण वॉर्डांमध्येही हीच स्थिती होती. यामुळे येथे आगीची घटना घडल्यास मोठा धोका होण्याची भिती होती. 

येथे सुमारे एक हजार पेक्षा जास्त रुग्ण भरती असतात. यामुळे अग्निशमन यंत्रणा गरजेची बनली. केवळ आग विझवण्याचे यंत्र भिंतीवर टांगलेले दिसत होते. विशेष असे की, मेडिकलकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे येथील अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट झाले नाही. 

भंडाऱ्यात १० चिमुकल्यांचा जळून मृत्यू झाल्यानंतर मात्र मेडिकलमध्येही फायर ऑडिटच्या विषयावरून गोंधळ उडाला. सुमारे ११ कोटींचा सादर झालेला प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याची माहिती पुढे आली. त्यातच नव्याने मेडिकल कोविड हॉस्पिटलम्हणून घोषित करण्यात आले. यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून ८ कोटी ९४ लाखांचा निधी मेडिकलला मिळाला आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांचे प्रयत्न अधिक मोलाचे ठरले. मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आली होती. 

कालांतराने गरजेच्या तुलनेत ती यंत्रणा तोकडी होती. तेथील ८४ लाखांचा प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू आहे. तातडीने हा प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. परंतु तांत्रिक बाबींमुळे याला विलंब झाला आहे. मेयोचा प्रस्ताव तातडीने सादर करून त्याला निधी मिळणार असल्याचे मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया म्हणाले.

मेडिकलमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी निधी मिळाला आहे. आग लागल्यास तत्काळ सूचना देणारे सेंसर, पाणी मारणारे फवारे तसेच इतर आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच काम पूर्ण होईल.
-डॉ. सुधीर गुप्ता, 
अधिष्ठाता, मेडिकल.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : धुळ्यात मिरच्या मारुती शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनची तोडफोड

Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सॅलरी अकाउंटमध्येच मिळणार २ कोटी रुपयांचे विमा संरक्षण; काय आहे नवीन प्लॅन

Nashik Municipal Election : नाशिककर लक्ष द्या! मतमोजणीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; 'या' मार्गांवर वाहतूक बदल

'इतकं वाईट नका दाखवू' 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत अंशुमनने कट रचून रोहनचा अपघात केला, नेटकरी संतापले, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयची शोधमोहीम

SCROLL FOR NEXT