Government is not giving benefit of home schemes to poor people  
नागपूर

अजब कारभार! मालकीचे घर असणाऱ्यांना मिळतोय घरकुल योजनेचा लाभ; भटक्या गोरगरिबांचा संसार मात्र उघड्यावरच

अनिल पवार

चांपा (जि. नागपूर) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेचा लाभ गरजूंना न मिळाल्याने अजूनही लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. बिरसानगर कुही फाटा या गावात भटक्या आदिवासींना अद्यापी या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. उलट ज्यांच्याकडे घरेदारे, शेतजमीन आहे. अशांना या योजनेचा लाभ देण्यात येेत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. 

उमरेड तालुक्यातील बिरसानगर कुही फाटा अनेक समस्यांचे माहेरघरच बनलेले आहे. आदिवासी भटक्यांच्या वस्तीत गेल्या चाळीस वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पाचगाव पोलिस चौकीच्या मागे भारवाड समाजाच्या बेड्यावर पिण्याचे पाणी, पक्के घर, अंगणवाडी, नागपूर उमरेड महामार्ग ते बेड्यापर्यंत पक्के सिमेंट रस्ते अशा अनेक मूलभत सुविधांचा अभाव आहे. त्यातच आदिवासी भटक्यांच्या वस्तीनजीकच्या उमरेड महामार्गाच्या कामामुळे या मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली असून जड वाहतुकीमुळे सर्वत्र धूळ उडाल्याने घर धूळमय झाले आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. .

आदिवासी भटक्या समाजातील गोरगरीब, भूमिहीन, अपंग, विधवा,बेघर यांच्यासाठी अनेक शासकीय योजना राबविण्यात येत असल्या तरी खऱ्या व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. गरजू लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष ग्रामसभेतुन करण्यात यावी, या प्रकारचे नियम असताना देखील स्थानिक पातळीवर गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात येते. हाच अनुभव बिरसानगर कुही फाटा येथील गरजू लाभार्थ्यांना आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

या प्रकरणात गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी स्वतः लक्ष घालून भटक्या आदिवासी समाजातील भूमिहीन गरीब, मजूर, विधवा, अपंग अशा व्यक्तीना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी भारवाड समाजाचे कार्यकर्ते हरी बोलया यांनी केली आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पक्के घरकुल, बेड्यापर्यंत सिमेंट रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आमच्या बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केले परंतु आमच्या हाती निराशा आली.आमच्या निवेदनाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. 
हरी जीवन बोलया 
ग्रामस्थ भारवाड बेडा कुही फाटा 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT