government order of school start not reach to district collector and corporation commissioner in nagpur 
नागपूर

शाळा सुरू करायच्या कशा? शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केली, पण सक्षम प्राधिकाऱ्यांना आदेशच नाहीत

नीलेश डोये

नागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने तसे आदेश काढण्यात आले. परंतु, सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना आदेश 'मार्क'च करण्यात आले नाही. त्यामुळे दोन्ही प्राधिकारी निवांत असून शाळा सुरू करायच्या कशा, असाच प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. 

कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. टप्प्याटप्‍प्यात वर्ग सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग नोव्हेंबर २६ पासून सुरू करण्यात आले. नागपूर शहरात ४ जानेवारी, तर ग्रामीण भागात १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या. आता ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून करण्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. १८ जानेवारीला उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने तसे आदेश काढण्यात आले. साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार शहरात निर्णय घेण्यासाठी महानगर पालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले, तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी आहेत. शासनाने २६ नोव्‍हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती लक्षात शाळा उशिराने सुरू करण्यात आल्या. 

शिक्षण विभाग द्विधा मनःस्थितीत - 
१८ जानेवारीला काढण्यात आलेला आदेश राज्यपालांचे सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच शिक्षण आयुक्त, संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना 'मार्क' करण्यात आले. परंतु, जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांना 'मार्क' करण्यात आले नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यासोबतच आवश्यक उपाययोजना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार कसा, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT