governor koshyari commented on college opening in nagpur 
नागपूर

...अन् राज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारला खडसावले

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असताना महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू न होणे विसंगत व विपरीत वाटत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यसरकारला खडसावले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यावेळी सर्वच कुलगुरूंनी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली असता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. 

बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र, शासनाच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नाहीत. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरू करावेत, अशी मागणी विद्यार्थीदेखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपाल म्हणाले, विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष अगोदरच सुरू केले आहेत व ऑनलाइन पद्धतीने वर्गही सुरू आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अश्यावेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येईल का किंवा पाळीमध्ये चालवता येईल का याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगानेही महाविद्यालये कसे सुरू करावे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरू करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपापले लेखापरीक्षण नियमितपणे करून घ्यावे, अशीही सूचना राज्यपालांनी विद्यापीठांना केली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT