Grandmother murdered by drunken grandson 
नागपूर

बहिणीच्या प्रेमविवाहाला भावाचाच होता विरोध अन्‌ दारूच्या नशेत केले हे कृत्य... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दारुड्या नातवाने डोक्‍यावर मोठा दगड हाणून आजीची हत्या केली. सोमवारी मध्यरात्री टीव्ही टॉवरजवळील मानवतानगर झोपडपट्टीत ही थरारक घटना घडली. पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली आहे. 

राऊलाबाई गणवीर (70) असे मृत आजीचे तर लकी गणवीर (20) असे अटकेतील नातवाचे नाव आहे. गणवीर कुटुंब मानवतानगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे. लकी आणि त्याची बहीण निकिता लहानपणापासून आजीकडेच रहायचे. तर, त्यांची आई सरिता चिंतामणनगर, भिवसनखोरी येथील दुर्गामाता मंदिराजवळ रहायची. लकी भाजीपाला विक्रेत्याकडे मजुरीकाम करायचा. पण, ते केवळ नावापुरतेच होते. 
महिन्यातील अधिकाधिक दिवस घरीच असायचा.

दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच आजीकडे पैशांसाठी तगादा लावायचा. बहिणीने आपल्या पसंतीने लग्नासाठी मुलाची निवड केली. घरच्यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. पण, लकीचा त्याला विरोध होता. याच कारणावरून तो बहिणीला मारहाणही करीत होता. परिणामी घरात तणावाचे वातावरण होते. सोमवारी रात्री लकी दारूच्या नशेत घरी आला. त्याने बहिणीसोबत भांडण उकरून काढले. तिच्यावर हातही उगारला. 

आजीने विरोध करीत लकीलाच खडेबोल सुनावले. ती बडबड करीत असतानाच लकी घराबाहेर गेला. काही क्षणातच हातात मोठा दगड घेऊन परत आला. कोणताही विचार न करता दगडाने आजीच्या डोक्‍यावर फटका हाणला. वृद्ध आजी हा मार सहन करू शकली नाही. रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. 

घटनेमुळे घाबरलेली बहीण जोरात किंचाळली. यामुळे शेजारी गोळा झाले. शेजाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. तिथून गिट्टीखदान पोलिसांना कळविण्यात आले. लागलीच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी आरोपी नातू घरीच बसून होता. पोलिसांनी लागलीच त्याल ताब्यात घेतले. आरोपीची आई सरिता यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत लकीला अटक केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT