ग्राफीक्स sakal
नागपूर

‘ग्राफीक्स’चे वलय वाढतेयं

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

ग्राफिक डिझाइनला वर्तमानात तर आहेच पण भविष्यात ही मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. कारण, येत्या काळात मोठ्या प्रमाणावर ऑफलाइन व्यवसाय ऑनलाइन व्यवसायाकडे कूच करीत आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रांना त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची मदत आवश्यक भासत आहे, मग ती प्रकाशन गृहे असोत, जाहिरात क्षेत्र असोत, मार्केटिंग एजन्सी असोत किंवा पब्लिक रिलेशनशीप फर्म असोत प्रत्येकाला ग्राफिक डिझायनर्सची आवश्यक आहेच.

ग्राफिक्स डिझाइन म्हणजे काय?

ग्राफिक्स डिझाइन म्हणजे कमर्शिअल, फाइन आर्ट, कम्युनिकेशन, अप्लाईड आर्ट होय. टूडी व थ्रीडी अॅनिमेशन म्हणजे हलते-बोलते ग्राफिक्स डिझाइन आणि त्या अॅनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक्स डिझाइनच असते. पेन्सिलने काढलेली एक रेषा किंवा एक आकार आणि त्या आकारात रंग भरून काढलेले एक चित्र, एखाद्या कलाकाराने कॅनव्हासवर केलेले पेंटिंग किंवा फोटोग्राफरने काढलेला फोटो म्हणजे सुद्धा ग्राफिक्स डिझाइनच असते. आताच्या युगातील युझर इंटरफेस आणि युझर एक्स्पिरियन्स डिझाइन यांचा खूप गाजावाजा चाललाय तेही ग्राफिक्स डिझाइनच होय. थोडक्यात ज्याद्वारे एखादा संदेश दिला जातो, अशी कोणतीही कलाकृती म्हणजे ग्रफिक ‌डिझाइन.

सॉफ्टवेअर

ग्राफिक ‌डिझाइनसाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत. त्यात प्रामुख्याने कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इनडिझाइन आदींचा समावेश होतो. तसेच वेब ‌डिझाइनसाठी एचटीएमएस, सीएसएस, पीएचपी, जावा-स्क्रिप्ट, ड्रीमवेव्हर, व्हिज्युअल स्टुडियो इत्यादींचा समावेश होतो. व्हिडियोसाठी आफ्टर इफेक्ट शिकावे लागते.

संधी आणि शिक्षणाच्या सुविधा

  • करिअरच्या दृष्टीने जेव्हा ग्राफिक डिझाइनचा विचार केला जातो, तेव्हा ग्राफिक ‌डिझाइनमध्ये नेमके काय शिकायचे आणि शिकायला सुरवात कोठून करायची हा प्रश्न पडतोच. हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे. म्हटले तर खूप अवघड आणि समजून घेतला तर हा विषय एकदम सोपा आहे. यामध्ये जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब डिझाइन, अॅनिमेशन आणि प्रत्येकामध्ये उपप्रकार आहेत.

  • या क्षेत्रांत तुम्ही जितके प्रॅक्टिकल कराल, सराव कराल तितके तुमचे कौशल्य वाढणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्टिफिकेटपेक्षा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक ज्ञानाची गरज असते. शिक्षणाची सुरवात ही बारावीनंतर करू शकतो. यासाठीलागणाऱ्या मूलभूत गोष्टी सुरवातीपासून शिकल्या पाहिजेत.

  • तुम्हाला यात स्पेशलायझेशनही करता येते. आपले नियमित शिक्षण चालू ठेवून ग्राफिक डिझाइनचे कोर्स करणे शक्य आहे.

आवश्यक कौशल्ये

सर्जनशील कौशल्ये, नावीन्यपूर्ण विचार करण्याचं कौशल्य, लिखाण कौशल्य असले पाहिजेत, टायपिंग यायला हवी, आयटी कौशल्य असावे, खोलात विचार, करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचे व्यवस्थापन, इलुस्ट्रेटर सॉफ्टवेअर, फोटोशॉप इत्यादींचे सामान्य ज्ञान असणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT