file 
नागपूर

मित्रासोबत जात होती देवदर्शनाला, रस्त्यात घडले अघटीत...

सकाळ वृत्तसेवा

कुही (जि.नागपूर): ती जात होती मित्रासोबत देवदर्शनाला. पाळतीवर असलेल्या त्या पाच नराधमांनी त्यांची दुुचाकीवर अडविली व तरुणीवर पाचही आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवेगाव येथील जंगल परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


दुचाकी पडली बंद आणि त्यांनी साधली संधी
आकाश गुलाब लेंडे (26, वॉर्ड9), सुनील ऊर्फ सुमित यशवंत गवळी (27,कुही), सूरज बंडू मने (22, कुही), चंद्रशेखर रवींद्र कडव (19), पंकज विलास कुथे (22,कुही) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर येथील 19 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत खैरी येथे देवदर्शनाला दुचाकीवरून जात होती. नवेगाव येथील जंगल परिसरात युवतीची दुचाकी बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, त्या ठिकाणी पाच अनोळखी व्यक्‍ती आल्या. त्यांनी तरुणीचा मित्र व तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतला. मित्राला काही आरोपींनी पकडून ठेवले व काहींनी पीडितेला बाजूला घेऊन गेले. तेथे तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पीडित व पीडितेच्या मित्राला कुही बसस्थानकावर सोडून आरोपी फरार झाले.

घटनेचा व्हिडिओ केला शुट
आरोपी अत्याचारापर्यंतच थांबले नाहीत, तर या त्यांनी अत्याचाराचा व्हिडिओसुद्धा शुट केला. घटना कुणाला सांगितल्यास बदनामीची धमकी देत आरोपींनी पीडितेला अत्याचाराचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

क्‍लिक करा : रशियावरून आला नि थेट पकडली ट्रेन, नागपूर येताच झाले असे...

बारा तासांच्या आत आरोपी जेरबंद
तरुणीने कुही पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तोच पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्रे फिरविली व आरोपींचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून पाचही आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आता जेरबंद केले. ही कारवाई नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टवार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलिस उपनिरीक्षक गौरखेडे, हेडकॉन्स्टेबल संतोष पंधरे, रमेश भोयर, गजेंद्र
चौधरी, मदन आसतकर, महेश जाधव, पोलिस नाईक रामा आडे, पोलिस शिपाई साखरे, राधेश्‍याम कांबळे, सायबर सेलचे पोलिस शिपाई सतीश राठोड, चालक भाऊराव खंडाते व अमोल कुथे यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT